राजस्थान :-आठवी सिनियर व ज्युनियर मेन्स वूमेन्स मिनिगोल्फ ऑल इंडिया चॅम्पियनशिप राजस्थान येथील गोमती देवी पीजी कॉलेजमध्ये जिल्हा झुंझुनू येथे 1ते 5 जानेवारीला आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघात मोहपा येथील रहिवासी असलेली भैरवी शिशिर ढाले व पार्थ पंकज अंजनकर यांनी दोघांनीही राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केले असून भैरवी हिला संघात गोल्ड तर वैयक्तिकमध्ये सिल्वर व पार्थ याने डबल मिक्स मध्ये कांस्य पदक मिळविले. दोघांच्याही कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. भैरवी जवाहर कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी असून पार्थ न्यू इंग्लिश हायस्कुल येथील विद्यार्थी आहे. भैरवीने आपल्या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक गणेश निनावे व प्रशिक्षक योगेश बन यांना दिले आहे तर पार्थ ने प्रशिक्षक विनोद सुरदुसे व क्रीडा शिक्षक अनिल चिमोटे यांना दिले आहे. मुख्याध्यापक न्यू इंग्लिश हायस्कुल प्रकाश आदमने व मुख्याध्यापिका जवाहर कन्या विद्यालय सीमा गोतमारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तर मिनिगोल्फ असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा माजी आमदार दक्षिण नागपूर सुधाकर कोहळे, जनरल सेक्रेटरी डॉ. सुरज येवतीकर, अरविंद सहकारी बँकेचे संचालक डॉ. प्रविण मानवटकर, महाराष्ट्र प्रशिक्षक विनोद सुरदुसे, योगेश बन, टेक्निकल कमिटीचे चेयरमन राजेश शेंडेकर, सदस्य मोहन घोळे, अनिरुद्ध बिराजदार लातूर, सुधीर सुहागपुरे, गौरव सोनटक्के यांनी दोघांचेही अभिनंदन केले.