मध्य नागपुरात साकारणार उत्तम दर्जाचे इनडोअर स्टेडियम

– आ. प्रवीण दटके यांच्या प्रयत्नांना यश

नागपूर :- शहरात विशेषतः मध्य नागपूर परिसरातील नागरिकांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी मागील काही काळापासून आ. प्रवीण दटके प्रयत्नशील होते.

मध्य नागपूर सारख्या दाट लोकवस्ती असणाऱ्या भागात शालेय शिक्षण घेणाऱ्या, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवकांना तसेच नागरिकांना देखील व्यायाम तसेच खेळाच्या उत्तम सुविधा मिळण्यासाठी शहरातील विविध भागात जावे लागत होते, त्यामुळे मध्य नागपुरात उत्तम दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी आ. प्रवीण दटके शासन स्तरावर प्रयत्न करीत होते. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच क्रीडा मंत्री यांची भेट घेऊन मागणी केली होती.

प्रभाग क्र. 8 टिमकी , हंसापुरी हिंदी प्राथमिक शाळेच्या मैदानावर उच्च दर्जाचे स्विमिंग पुल आणि इनडोअर स्टेडियम बांधण्याकरिता आ. प्रवीण दटके यांच्या प्रयत्नाने रू.30 कोटींच्या कामास मान्यता देण्यात आली आहे

या स्टेडियममध्ये अल्ट्रा मॉडर्न स्विमिंग पूल,एलिव्हेटेड ट्रॅक , वॉकिंग ट्रॅक, टेनिस, विविध खेळांच्या सोयी, अत्याधुनिक जिम आदी उपलब्ध होणार आहे.

मध्य नागपुरातील जनतेने विशेषतः युवकांनी भविष्यात या स्टेडियमचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. दटके यांनी केले.तसेच या निर्णयाबद्दल आ. दटके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार सर्वांचे आभार व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपा प्रवक्त्यांसाठी प्रशिक्षण वर्ग

Wed Oct 16 , 2024
मुंबई :- भारतीय जनता पार्टीतर्फे पक्षाचे प्रवक्ते आणि पक्षाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांसाठी 17 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वर्गात राष्ट्रीय प्रवक्ते खा.सुधांशु त्रिवेदी, भाजपा माध्यम विभाग केंद्रीय समन्वयक आ.अतुल भातखळकर आदींचे मार्गदर्शन होणार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com