गडचिरोली :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्यापावेतो आपले आधार प्रमाणीकरण केले अशा 14 हजार 841 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 47 कोटी 30 लाख रुपये रक्कम शासनाने जमा केलेले असुन, यामध्ये गत ऑक्टोबर महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील 123 शेतकऱ्यांच्या खात्यात 48.00 लाख रूपये जमा करण्यात आले. या प्रोत्साहनपर लाभ योजनेसाठी गडचिरोली जिल्ह्यातील 112 शेतकऱ्यांनी अद्याप आपले आधार प्रमाणिकरण केले नाही. अशा शेतकऱ्यांनी नजीकच्या सुविधा केंद्र अथवा आपल्या बँक शाखेत आपले आधार प्रमाणिकीकरण करुन घ्यावे असे आवाहन शासनाने केले आहे. या योजनेमध्ये सन 2017-18, 2018-19, 2019-20 या तीन वर्षांमध्ये कोणत्याही दोन वर्षात बँकेकडून पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केली आहे अशा एकूण 14 हजार 841 हजार शेतकऱ्यांना आज पर्यंत एकूण 47.30 कोटी रुपये लाभ देण्यात आला आहे. असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरोली यांनी कळविले आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत 14 हजार 841 शेतक-यांना लाभ
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com