यवतमाळ :- संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ महाडीबीटीद्वारे वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे यवतमाळ तालुक्यातील लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लाभार्थ्यांना यापुढे त्यांचे अनुदान महा-डीबीटीद्वारे ऑनलाईन पध्दतीने वितरीत करण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत पासबूकची छायांकीत प्रत तसेच बँकेशी लिंक असलेल्या आधारकार्डची छायाकींत प्रत व मोबाईल नंबर संजय गांधी योजना निराधार विभागात सादर केलेले नाही, अशा लाभार्थ्यांचे दोनही योजनेचे अनुदान थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड व पासबुकची छायांकीत प्रत व मोबाईल नंबर तात्काळ तहसिल कार्यालय यवतमाळ येथे सादर करावे. तसेच आपण आपले आधारकार्ड व मोबाईल नंबर बँकेशी लिंक करुन घ्यावे, असे तहसिलदार योगेश देशमुख यांनी कळविले आहे.