– १५ दिवसांच्या आत मनपात अर्ज सदर करण्याचे तरुणांसह ,विविध संघटनांना आवाहन
नागपूर :- संपूर्ण जग आज ग्लोबल वॉर्मिंगने त्रस्त झाले आहे, हवामान बदलाचे परिणाम सर्वांनाच जाणवू लागले आहेत. ‘प्लास्टिक बंदी हे पर्यावरणीयदृष्ट्या उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. पर्यावरणासाठी सिंगल युज्ड प्लास्टिक हे घातक आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे टाळायला हवा, घरा घरातून निघणाऱ्या कचऱ्याचे जागीच वर्गीकरण करायला हवे, यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर या संकल्पनेला मूर्तरूप प्राप्त करून देण्यासाठी युवकांनी, समुहांनी, सेवाभावी संस्थांनी मनपाचे पर्यावरण मित्र म्हणून कार्य करावे असे आवाहन मनपाचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केले आहे.
मनपाच्या उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मागर्दर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात मनपाचे कर्मचारी कार्य करीत आहेत. या कार्यात सर्वसामान्य नागरिकांनी देखील आपला सक्रीय सहभाग नोंदवावा तसेच मनपा क्षेत्रात अधिसुचनेची अंबलबजावणी करण्याकरीता नियमाअंतर्गत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना नियमाच्या अमलंबजावणी बाबत मदत करावी, वा नियमाचे उल्लघंन करणाऱ्याबाबत माहिती द्यावी किंवा प्रधिकृत अधिकाऱ्यांना दंड आकारणे, प्लास्टिक व थर्माकॉल पासून बनविलेला माल जप्त करणे, गुन्हा नोंदविण्यास मदत करणे इत्यादी कार्य पार पाडण्यासाठी व सहाय्य करण्याकरिता इच्छुक व्यक्तींना /व्यक्तीच्या समूहाने, सेवाभावी संस्था, औद्योगिक घटकांची संघटना, स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य यांनी प्राधिकृत अधिकारी मा. उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, 5 वा माळा येथे 15 दिवसाच्या आत कार्यालयीन वेळेत या कार्यासाठी ‘पर्यावरण मित्र” म्हणून अर्ज सादर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.