कंजंक्टिवायटिस या डोळयांच्या आजारापासून सतर्क राहा – मनपाच्या आरोग्य विभागाचे आवाहन

नागपूर :- पावसाळ्यात वातावरणात अनेक सूक्ष्म बदल झाल्याचे दिसून येते, वातावरणामध्ये बदल झाल्याने बॅक्टेरीया किंवा वायरस सारख्या सूक्ष्म जिवाणूंमुळे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशातच कंजंक्टिवायटिस (नेत्रश्लेष्मला) हा डोळयांचा आजार होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे, आवाहन नागपूर महानगरपालिकाद्वारे करण्यात आले आहे.

कंजंक्टिवायटिस हा संसर्ग प्रामुख्याने वातावरणामध्ये बदल झाल्याने बॅक्टेरीया किंवा वायरस सारख्या सूक्ष्म जिवाणूंमुळे पसरतो. सध्या डोळ्या संदर्भातील आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली असून, दिवसेंदिवस डोळयांची साथ होणारे अनेक रुग्ण सापडत आहेत. कंजंक्टिवायटिस (नेत्रश्लेष्मला) हा डोळ्यांच्या संसर्गामुळे पांढऱ्या भागावरती असलेल्या पातळ ऊतींची आणि पापणीच्या आतल्या बाजूस दाह संसर्गामुळे होतो. आजवर या आजाराच्या 380 पेक्षा अधिक रुग्णाची नोंद नागपूर महानगरपालिका आरोग्य केंद्रात झाली आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन मनपाच्या नोडल (साथरोग) वैद्यकिय अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी केले आहे.

हा आजार प्रामुख्याने एका व्यक्तिकडून दुस-या व्याक्तिकडे सहज पसरू शकतो. पण योग्य वेळेला निदान झाल्यास काही चिंता नाही. हा आजार फक्त शरीर संपर्काद्वारे आणि स्त्राव संपर्काद्वारे पसरू शकतो. तरी कंजंक्टिवायटिस संबंधित काही लक्षणं दिसल्यास वेळीच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा किंवा महानगरपालिका आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करावेत असेही आवाहन मनपाच्या नोडल (साथरोग) वैद्यकिय अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी केले आहे.

लक्षणे :- 

– कंजंक्टिवा (नेत्रश्लेष्मला) वरती सुज येणे.

– डोळयाच्या पांढरा भाग किंवा पापणीच्या आतील भाग लाल होणे.

– डोळयाची आग होणे आणि खाज सुटणे.

– धुसर दृष्टी आणि प्रकाश प्रती संवेदणशीलता.

– डोळयातुन स्त्राव येणे.

प्रतिबंधात्मक उपाय :-

– स्वच्छता राखणे : नियमितपणे हात धुवावे आणि डोळ्यांना सारखा हात लावणे टाळावे.

– टॉवेल किंवा रुमाल : ऐकमेकांचा वापरु नये.

– उशीची खोळ नियमित पणे बदलावी.

– डोळ्यांची सौंदर्य प्रसाधने किंवा डोळ्यांची काळजी घेणाऱ्या वस्तू: एकमेकांच्या वापरू नये.

कंजंक्टिवायटिस झाल्यास घ्यावयाची काळजी :-

– संपूर्ण विलगीकरनासह घरी राहुन विश्रांती घ्यावी, ज्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकेल.

– टॉवेल किंवा रुमाल कुणालाही वापरायला देऊ नये.

– आपले कपडे वेगळे धुतले जातील याची काळजी घ्यावी.

– लक्षणे दिसुन आल्यास स्वत:च्या मनाने औषध घेऊ नये वैद्यकियतज्ञांचा सल्ला घ्यावा.

– संसर्ग जाई पर्यत दररोज उशीची खोळ बदलावी.

– संसर्ग झालेला डोळा बोटाने चोळू नये. आवश्यक असल्यास टिशुचा वापर करावा.

– डोळयात धूळ किंवा काही जाण्यापासून जपावे, अन्यथा त्रास वाढू शकतो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वृक्ष लावा दारोदारी -पसरेल समृध्दी घरोघरी - जिल्हाधिकारी योगोश कुंभेजकर

Wed Jul 26 , 2023
भंडारा :- वृक्षारोपण हे ईश्वरीय कार्य असून कार्य असून निसर्गाच्या संतुलनासाठी वृक्षारोपण गरजेचे वृक्ष लावल्यानेच घराघरात समृद्धी येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश गुंडेकर यांनी केसलवाडा येथील वृक्षारोपण कार्यक्रमात केले. केसलवाडा येथील व कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना जिल्हाधिकारी हजार वृक्षारोपणाचा कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर बोलत होते.यावेळी गावकऱ्यांनी त्यांचा शाल ,श्रीफळ आणि सोबतच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com