बावनकुळे तर भाजपचे ‘नंगा भगीरथ’ ते काय राहुल गांधींना रोखणार ? प्रदेश प्रवक्ता दिलीप एडतकर यांचे टीकास्त्र

अमरावती :- राहुल गांधी यांनी आधी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याची माफी मागावी आणि नंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा असे म्हणणारे चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे ‘ नंगा भगीरथ’ असून त्यांनी प्रथम त्यांच्या पक्षाच्या वाचाळवीरांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज , क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले , क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले , कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अवमान केल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ता दिलीप एडतकर यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील भाजप केव्हाच यमसदनी गेली असून आता जी भाजप दिसते आहे ती मूळ भाजप नसून इतर पक्षांच्या नेत्यांना ईडी, सीबीआयची भीती घालून एकत्रित केलेली गोळाबेरीज तेवढी असल्याचे सांगत मूळ भाजप केव्हाच मेली आहे आता जी जिवंत आहे ती खरी भाजप नाहीच त्यामुळे या मृत झालेल्या भाजपचे विधूर चंद्रशेखर बावनकुळे ‘ नंगा भगीरथ ‘ आहेत अशी टीका दिलीप एडतकर यांनी केली आहे . विधवा महिलेला गंगा भागीरथी म्हणण्याच्या मनुवादी परंपरेला पुनरुज्जीवित करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता विधूर व्यक्तीस ‘ नंगा भागीरथ ‘ म्हणण्याचा फतवा काढावा आणि त्याची सुरुवात आपल्या पक्षापासूनच करावी असेही दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे बहुजन समाजासाठी तसे आदरणीय व्यक्तिमत्व असले तरी आपला माणूस मनुवादी पक्षात असल्याचे दुःखही बहुजन समाजाला वारंवार होत असते असे सांगत राहुल गांधींना महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्याची औकात भाजपत नाही, माफी मागून शिक्षेतून सुटणाऱ्या पिलावळीला काँग्रेस भीक घालत नाही त्यामुळे राहुल गांधींनी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि तशी मागणी करण्याचा कोणताही अधिकार माफीवीरांच्या वैचारिक वंशावळीला नाही असे दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.

भाजप वा भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना सावरकरांबद्दल कोणतेही प्रेम,आदर नसून सावरकर हा मुद्दा केवळ आणि केवळ काँग्रेस व शिवसेनेत वितुष्ट यावे म्हणून उगाळत ठेवण्याचा भाजपचा राजकीय प्रयत्न असून त्यासाठी आता बावनकुळे यांनीच माफी मागावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस प्रवक्ता दिलीप एडतकर यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डॉ विंकी रुघवानी भुवनेश्वर में सिविल20 (जी-20) वर्किंग ग्रुप समिट के लिए आमंत्रित

Sat Apr 15 , 2023
नागपूर :-प्रख्यात बालरोग विशेषज्ञ और थैलेसीमिया एंड सिकलसेल सोसाइटी के अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी को 22 और 23 अप्रैल, 2023 को कलिंग इंस्टिट्यूट ऑफ़ इंडस्ट्रियल टेक्नोलॉजी (KIIT) भुवनेश्वर, ओडिशा, भारत में होने वाले आगामी सिविल20 (जी-20) जेंडर इक्वलिटी एंड डिसेबिलिटी वर्किंग ग्रुप समिट में आमंत्रित किया गया है। इस समिट में दुनिया भर के विशेष नागरिक, समाज संगठन, विशेषज्ञ, सरकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com