मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
ग्रामिण पत्रकार संघ व्दारे बाळशास्त्री जांभेकर यांची २११ वी जयंती पत्रकार दिवसाने साजरी.
कन्हान (नागपुर) : – मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पण कार बाळ शास्त्री जांभेकर यांची २११ वी जयंती ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व्दारे राष्ट्रीय पत्रकार दिवसी पत्रकार, वृत्त पत्र विक्रेता व वितरकांचा सत्कार करून सहभोजनासह बाळ शास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिवस थाटात साजरा करण्यात आला.
ग्रामिण पत्रकार संघ कन्हानव्दारे शुक्रवार (दि.६) जानेवारी ला डोणेकर सभागृह कन्हान येथे रात्री ८ वा. जेष्ठ पत्रकार अजय त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेत व प्रमुख अतिथी कन्हानचे वरिष्ट पोलीस निरिक्षक विलास काळे, पत्रकार संघाचे मार्गदर्शक जेष्ट पत्रकार एन एस मालविये, ढिवर समाज सेवा संघटना अध्यक्ष व वृत्तपत्र विक्रेता सुतेश मारबते, मराठी पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष सुर्यभान फरकाडे आदी च्या हस्ते बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार, पुष्प अर्पण व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
कन्हान थानेदार विलास काळे सह मंचावरील मान्यवरांचे आणि प्रतिष्ठीत प्रभाकर रूंघे, वामन देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे आदीचा स्वागत, सत्कार करण्यात आला. ” हिवाळा, उन्हाळा व पावसाळा असो परंतु पहाटे सकाळी पासुन दैनिक वृत्तपत्र वाचकाना घरो घरी पोहचविण्याचे महत्वाचे काम करून पत्रकारांच्या बातम्याना खरा न्याय देण्याचे कार्य करित असल्याने पत्रकारासह वृत्तपत्र विक्रेता व वितरक वृत्र पत्राचे मौलिक कार्य करित असतात” असे गौरव उदगाराने आपल्या मार्गदर्शनात जेष्ट पत्रकार एन एस मालविये हयानी केले. यावेळी पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता आणि वितरक या विषयी थानेदार विलास काळे, सुतेश मारबते, धंनजय कापसीकर, सतिश घारड आदीनी उपस्थितानी मार्गदर्शनपर संबोधित केले. नवनिवार्चित टेकाडी ग्रा प सदस्य व पत्रकार सतिश घारड यांच्या वाढदिवसी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कन्हानचे जेष्ट पत्र कार एन एस मालविये, अजय त्रिवेदी, मोहन रंगारी, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुर्यभान फरकाडे, किशोर वासाडे, धंनजय कापसीकर, विवेक पाटील, ग्रामिण पत्रकार संघ अध्यक्ष मोतीराम रहाटे, कार्याध्यक्ष कमलसिंग यादव, सचिव सुनिल सरोदे, कोषाध्यक्ष ऋृषभ बावनकर, शांताराम जळते, गणेश खोब्रागडे, रविंद्र दुपारे, रोहीत मानवटकर, आकाश पंडीतकर आदी पत्रकारांचा तसेच वृत्तपत्र विक्रेता सुतेश मारबते, श्रीधर शेट्टी, मोहीत वतेकर, योगेश बर्वे, वितरक सोनु मानकर, अमित बावने, सुरेश वाघमारे, कोविद मारबते, क्षीतिज मोटघरे, रोहीत वतेकर, साहील वानखेडे, प्रशांत गणोरकर, चेतन महाजन आदीचा शाल, फुलाचे वृक्ष रोपटे, पेन, डॉयरी देऊन मान्यवरां च्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश खोब्रागडे हयानी तर आभार प्रदर्शन मोतीराम रहाटे हयानी व्यकत केले. सहभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.