संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका कामठी यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त समतापर्वात सामाजिक न्याय विभागाचे शासकीय मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह नांदा(कोराडी)ता. कामठी येथे समता पर्व निमित्त वकृत्व स्पर्धा व भीम गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आलाा. (स्पर्धेचा विषय लोकतांत्रिक यंत्रणेची आजची परिस्थिती)
कार्यक्रमाचे अध्यक्ष – . लोखंडे वस्तीगृहाचे गृहपाल
कार्यक्रमाचे उद्घाटक – महृदय गोडबोले(प्रकल्प अधिकारी नागपूर)व त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजक सुनिता गेडाम (कन्नाके) समता दूत कामठी यांच्या तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले,शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच कार्यक्रमाची सुरुवात ही संविधान प्रास्ताविक याचे वाचन करून करण्यात आली सदर कार्यक्रमांमध्ये समाज कल्याण व बार्टीच्या योजनांची माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्र संबंधी माहिती सांगण्यात आली. त्याचप्रमाणे प्रकल्प अधिकारी गोडबोले यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक करून मुलांना सुंदर अशी मार्गदर्शन केले. सुंदर गीत गायनातून वातावरण प्रफुल्लित झाले व वकृत्व स्पर्धेमध्ये विविध मुलांनी छान अशी माहिती सादर केली कार्यक्रमाचा शेवट वस्तीगृहातील गृहपाल लोखंडे यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आले व शेवट आभार प्रदर्शनी करण्यात आले. महाराष्ट्रात समतापर्वाचे आयोजन बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विभाग प्रमुख डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण व नागपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी ह्रदय गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त कार्यक्रम पार पाडण्यात आला.या कार्यक्रमाला अध्यापक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.