राज ठाकरे असे एकमेव नेते जे मित्र असेल किंवा कितीही प्रभावी विरोधक, एखाद्याविषयी नेमके मत व्यक्त करतांना ते कधीही मागे पुढे पाहत नाहीत, फायदा नुकसान किंवा चांगल्या वाईट परिणामांचा तर ते कधीही विचार करीत नाहीत. वास्तविक एकनाथ शिंदे त्यांचे राजकीय विरोधक पण कमलेश सुतार यांना ऐन निवडणुकांच्या तोंडावर दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, नेत्यांनी सत्तेत असताना किंवा राजकारणात असतांना अजिबात कंजूष असता कामा नये, शिंदे हा अत्यंत दिलदार आणि मोठ्या मनाचा माणूस आहे असे राज म्हणाले त्यावर त्यांनी हृदयाला भिडणारे एक उदाहरण देखील दिले, पुण्यातल्या पुरात दोन लहान मुले शॉक लागून गेली मी त्यांना भेटून सांगितल्यावर त्यांनी तेथल्या तेथे त्या मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा दहा लाख रुपयांची मदत केली. हे वाक्य उद्धव यांच्या तोंडून शोभले नसते कारण राजकारणातून काहीही न करता घरबसल्या पोतेच्या पोते पैसे त्यांना आम्ही कसे मिळवून दिले हे सांगणारे अनेक नेते माझ्या यादीत आहेत किंबहुना आज ज्या मनोहरपंतांच्या पंक्तीला बसणसर्या नेत्याला उद्धव यांनी पूर्णतः राजकीय अडगळीत टाकले आहे त्या नेत्याने एक दिवस व्यक्तिश: मला डोळ्यात पाणी आणून सांगितले होते कि जर आमदार नामदारांनी किंवा ज्यांना विविध मंडळांची पालिका महापालिकेची पदे देण्यात आलेली आहेत त्यांना काय कमवायचे आहेत त्यांनी खूप कामवावेत तो ज्याचा त्याचा प्रश्न पण जर त्यातल्या एखाद्याने गुरुदक्षिणा मातोश्रीवर नियमित पोहोचवली नाही तर पुढल्या काहीच महिन्यात त्याला मोठ्या खुबीने सत्तेच्या राजकारणातून हमखास अडगळीत फेकले जाई…
दुसरा मुद्दा त्यांच्याच घरातल्या राज ठाकरेंचा, ठाकरे कुटुंबातले एकमेव राज असे कि ते खिशात असतांना किंवा प्रसंगी नसतांना देखील अडचणीत सापडलेल्यांना आर्थिक मदत सढळ हस्ते करतात किंबहुना आजतागायत कधीही सत्ता हाती नसतांना म्हणजे त्यांच्या मनसेला फारसे आर्थिक पाठबळ किंवा आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही मार्ग उपलब्ध नसताना हा पक्ष जिवंत ठेवण्यात राज यांनी केलेली कसरत आणि जपलेली दिलदार वृत्ती त्याला तोड नाही. जर उद्धव यांनी सढळ हस्ते लोकांना सहकार्य केले असते तर आज जी त्यांची त्यांच्या शिवसेनेची मोठी दुरावस्था झाली आहे तो बाका प्रसंग त्यांच्यावर नक्कीच कधीही ओढवला नसता. त्यांना या विधानसभा निवडणुकीत उशिरा शहाणपण सुचले आहे त्यांनी यावेळी त्यांच्या उमेदवारांना कसे तीन कोटी प्रत्येकी पाठविले, तो पुरावा त्यांच्याच एका जवळच्या विश्वासू नेत्याच्या तोंडून ऐकतांना मला जरा हायसे वाटले, उद्धव ठाकरे यांच्या बॅग्स का तपासल्या गेल्या हे आता तुमच्या लक्षात असले असेलच. हा एकनाथ शिंदे तर अडचणीत असणाऱ्यांना आर्थिक मदत सहकार्य करण्याच्या बाबतीत त्या आनंद दिघे यांच्या दोन पावले पुढे म्हणजे दिवसभरात भेटणार्या अनेकांना आर्थिक सहकार्य करतांना हेच आनंद दिघे अनेकदा मित्रांकडून उसनवार पैसे आणताना मी बघितले आहेत, शिंदे त्यांच्या दोन पावले पुढे, लोकसभा निवडणुकी दरम्यान याच एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या पक्षाचे आर्थिक गणिते जुळवितांना झालेले हाल आणि त्यांनी केलेली धावपळ मला तोंडपाठ आहे….
नेता हा मोठ्या मनाचा असलाच पाहिजे, जे नेते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे किंवा शरद पवार राज ठाकरे गणेश नाईक दत्ता मेघे या पद्धतीचे दानशूर आहेत प्रसंगी ते सत्तेत असतील किंवा नसतीलही पण त्यांचे राजकीय महत्व आणि अस्तित्व काकंणभर देखील कमी होत नसते, नाही किंबहुना उद्धव ठाकरे यांच्या पावलावर पाऊल अजित पवार त्यांनीही अमापसमाप कमविले पण एखाद्याला आर्थिक मदत करण्याची किंवा त्यांच्या राजकीय टेरेटरी बाहेर भेटणार्या एखाद्याचे काम न करवून देण्याची कंजूष वृत्तीच त्यांच्या राजकीय यशाच्या आड आली, अन्यथा अजितदादा जेव्हा काकांना लाथाडून बाहेर पडले त्यांना आजचे हाल नक्की सोसावे लागले नसते, काका दिलदार हे महाकंजूष म्हणून बहुतेक नेते आणि कार्यकर्ते काकांकडे ते सत्तेत नसतांना देखील त्यांच्याकडे परतले. यावेळी मात्र दादांची बारामती नव्हे मती ठिकाणावर आलेली दिसते, त्यांनी जाहिरातींवर चक्क 250 कोटी रुपये खर्च केले पण ते वायफळ गेले, मी राहून राहून सांगेन किंबहुना या विधानसभेला त्यांना जे काय यश मिळणार आहे ती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची महाकृपा म्हणावी लागेल, जेथे जेथे अजितदादांचे उमेदवार उभे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी शिंदे शिवसेना आणि भाजपा त्यांना मनापासून सहकार्य करते आहे याउलट जेथे शिंदे सेनेचे किंवा भाजपाचे उमेदवार उभे आहेत त्या त्या ठिकाणी हमखास अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते फक्त आणि फक्त महाआघाडीच्या उमेदवारांना मोठे सहकार्य करताहेत हीच वस्तुस्थिती आहे. एक महत्वाचा मुद्दा त्या शिंदे, फडणवीसांनी डोळ्यात तेल घालून विचार करण्यासारखा, अजितदादांचे जे काय उमेदवार निवडून येतील त्यातले बहुतेक त्या शरद पवारांनी जर इशारा केला तर नक्कीच महाआघाडीला हमखास जाऊन मिळतील थोडक्यात महायुतीसाठी शरद पवारांनी खोदून ठेवलेला फार मोठा खड्डा, माहिती घेऊनच मी हे सारे काही येथे सांगितले आहे. उद्याच्या भागात एकनाथ आणि डॉ श्रीकांत शिंदे यांच्याविषयी खूप खूप काही…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी