1 लाखावर थकबाकी असणाऱ्यांच्या नावाचे लागले बॅनर

चंद्रपूर :- 1 लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या थकबाकीदारांना करभरणा करण्यास मनपाद्वारे 21 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र तोपर्यंत करभरणा न करणाऱ्या सर्व थकबाकीदारांची नावे सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध केली गेली असुन शहरातील वर्दळीच्या सर्व चौकांवर असे बॅनर लावण्यात आले आहे.

यात विनोद बुराडे -116278,लागूबाई भुफा-153184 ,नामदेवराव पारवेकर- 150086,केवलराम गुलाणी- 456082, विनस बनोत-122977,विदर्भ काँक्रीट प्रा. -198557,विठ्ठल पंदीलवार- 320515,मो. नजीर अ. करीम-177441,महंमद वसिउद्दिन-362228 ,निर्मलादेवी पंडीत- 620491, शामराव लांडगे-1180007 समृद्ध जीवन फूड्स लि.- 469093,सायराबाई गांधी-166911, रीना सरकार-203392,समृद्धी सेविंग इन्व्हेस्टमेंट-180620 असे एकुण 51 लक्ष 29 हजार थकबाकी असणाऱ्या 16 थकबाकीदारांची नावे प्रकाशित करण्यात आली आहे.

शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते, परंतु सुविधांचा लाभ घेणारे अनेक जण कराचा भरणा करण्यासाठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठीच मनपाद्वारे थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहिम राबविण्यास येत आहे. कर विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिकांना समजावून सांगत असल्याने अनेक जणांनी कराचा भरणा केला आहे.

1 लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मनपाच्या अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे पाठपुरावा करण्यात आला होता. यासाठी त्यांना यासाठी 21 मार्चची मुदतसुद्धा देण्यात आली होती.मात्र याउपर करभरणा न केल्यास थकबाकीदारांची नावांचे बॅनर प्रसिद्ध करण्यात आले आहे. नावे प्रसिद्ध झाल्यानंतर जर कुणाची मानहानी झाली तर त्याला ते स्वतः जबाबदार राहणार असल्याचे चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे याआधीच स्पष्ट करण्यात आले होते. या होणाऱ्या कारवाईमुळे ज्यांना या मोहिमेच्या परिणामांची कल्पना आली होती त्या थकीतदारांनी ऑनलाईन तसेच अथवा ऑफलाईन माध्यमातुन आपल्या कराचा भरणा केला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

निर्दयी हत्या करणाऱ्या अज्ञात आरोपीतांचा १२ तासात शोधुन पकडले

Tue Mar 25 , 2025
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण व कन्हान पोलीसांची कारवाई कन्हान :- सदभावना नगर कांद्री-कन्हान येथील रहिवासी महेंद्र बर्वे यांची अज्ञात आरोपीनी रात्रीला पानता वने कॉलेज जवळील हरडे लेआऊट च्या जागेत चाकुने मारून व दगडाने ठेचुन निर्दयी हत्या करण्या-या आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण व कन्हान पोलीसांनी शोधुन तुषार गुरधे व तीन विधीसंघर्ष बालक असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!