खते व कीटकनाशकांच्या वाढत्या महागाईने बळीराजा आर्थीक संकटात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

-शेतकऱ्याने शेती करावी तरी कशी?

कामठी :- आजच्या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकापासून ते शेतकऱ्यांचे हाल बेहाल झाले आहेत त्यातच वाढत्या महागाईने सर्वांचे कंबरडे मोडले आहेत तरीसुद्धा बळीराजा नव्या उमेदीने खरीप हंगामाच्या शेतीकामाला गती देत आहेत .शेती करताना शेतीचे उत्पन्न चांगले मिळावे यासाठी शेतकरी राजा हा सुरुवातीला उत्पादकतेवर भर देतो .अधिक उत्पन्नासाठी खते, कीटकनाशके, उच्च प्रतीची बियाणे चा वापर करीत असतो मात्र शेतीसाठी अतिआवश्यक असलेल्या खते, कीटकनाशके व बियाण्यात बेसुमार वाढ केल्याने शेतकऱ्याने शेती करावी तरी कशी असा प्रश्न उभा होऊन ठाकला आहे.

मागील दहा वर्षाचा विचार केला असता डीएपी खताची पिशवीची किंमत ही सद्यस्थितीत महागाई च्या वाढीवर आहेत , शेतीकामात उपयोगात येणाऱ्या ट्रेकटर चे इंधन महाग झाले आहे. या सर्व बाबतीत झालेली भरमसाठ वाढीमुळे बळीराजा हा आर्थिक संकटात सापडला आहे.

ब्रिटिश काळापासून देशात किमान हमीभाव प्रणाली सुरू आहे त्यात या शासंनकर्त्यांनी या प्रणालीत शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत बदल केला असला तरी किमान आधारभूत किमती संदर्भात अद्यापही कायदा करण्यास कुठल्याही सरकारला यश आले नाही .24 डिसेंबर 1964 रोजी किमान हमी भावाला मंजुरी मिळाली.31 ऑक्टोबर 1965 रोजी केंद्र शासनाचे सचिव बी शिवरामन यांनी यावर शिक्कामोर्तब केला.यानंतर सन 1965-66 च्या हंगामासाठी सर्वप्रथम गव्हाच्या किमान हमीभाव किमतीची घोषणा करण्यात आली.तेव्हापासून आजपर्यंत केंद्रातील सरकारने प्रत्येक हंगामात त्या त्या शेतमालाचे हमीभाव जाहीर केले आहे.आजघडीला शेतकऱ्यांना बियाणे, खरेदीपासून कीटकनाशक, खत, इंधनाचा खर्च लक्षात घेतल्यास शेतकरी हा शेतीव्यसाय हा नुकसानदायक ठरत आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ग्रीष्म अवकाश में रेलवे ई-टिकटों की हो रही कालाबाजारी 

Thu May 16 , 2024
– सवा दो लाख का माल जब्त नागपुर :- ग्रीष्म अवकाश तथा विवाह समारोहों के चलते ट्रेनों में यात्रियों को हो रही भीड का फायदा दलाल उठा रहे है. अवैध तरीके से ई-टिकट लेने वाले और इसके बाद उनकी कालाबाजारी करके यात्रियों की लूट करने वाले दलालों के खिलाफ दक्षिण पूर्व मध्य रेलवे के रेलवे सुरक्षा दल ने कार्रवाई की […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com