नागपूर – स्वछताचे जनक, अंधश्रद्धा विरोधी व प्रबोधनकार संत गाडगे बाबा ह्यांच्या 146 व्या जयंती निमित्त नागपूर बसपाच्या वतीने मेडिकल कॉलेज परिसरातील गाडगेबाबा धर्मशाळेतील गाडगे बाबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महाराष्ट्र प्रदेशचे कोषाध्यक्ष महेंद्र रामटेके, प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, माजी प्रदेश सचिव उत्तम शेवडे, मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, महिला आघाडीच्या सुरेखाताई डोंगरे, वर्षाताई वाघमारे, दक्षिण पश्चिम विधानसभेचे अध्यक्ष ओपुल तामगाडगे यांच्या हस्ते माल्यार्पण करून आंदराजली वाहण्यात आली. याप्रसंगी गाडगेबाबा ह्यांनी आपल्या हयातीत स्वछता अभियानातून आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला स्वतःच्या कृतीतून दिला होता. त्याच वेळी अंधश्रद्धा सोडून विज्ञान वादाची कास धरन्याचा मंत्र सुद्धा गाडगे बाबांनी दिला होता त्यावर अंमल करण्याची जबाबदारी जनतेची असल्याचे मत बसपा नेत्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मध्य नागपूर चे अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष सुरज यावले, शहर प्रभारी शंकर थुल, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, माजी पक्षनेता गौतम पाटील, जिल्हा सचिव नितीन वंजारी, सदानंद जामगडे, विलास पाटील, सुनील बारमाटे, अभय डोंगरे, मंगेश पगारे, योगेश लांजेवार, राजेंद्र फुले, महासचिव विशाल बनसोड, सुरेंद्र डोंगरे, देवेंद्र मेश्राम, भानुदास ढोरे, जगदीश गेडाम, हर्षवर्धन जिभे, रमेश वानखेडे, विलास मून, चांगदेव शेंडे, सचिन कुंभारे, राजेंद्र सुखदेवे, विकास नारायने, सुनील दरवाडे, सुनील सोनटक्के, सुमित जांभुळकर, धनराज हाडके, सुभाष गजभिये, राजा बढेल, सुंदर भलावी आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
बहुजन समाज पार्टी दक्षिण-पश्चिम विधानसभेच्या वतीने संत गाडगेबाबा महाराज जयंती साजरी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com