बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- मुंबई लगतच्या बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.बदलापूर मधील एका शाळेतील मुलीवर झालेल्या अत्याचारा नंतर देशभरात संताप व्यक्त केल्या जात असताना कामठी तालुक्यातील महिलांनी आपल्या संतापजनक भावना व्यक्त केल्या.

1)प्रांजल वाघ

माजी सरपंच ग्रा प कढोली

– महिला व मुलींवरील अत्याचार होणे ही बाब समाजमन सुन्न करणारी आहे.बदलापूर येथील दोन चिमुकल्यावर झालेला हा अत्याचार संतापजनक आहे.अशा आरोपीवर तात्काळ कारवाई करण्यासाठी शासनाने कायमस्वरूपी कायद्यांनव्ये शिक्षा देण्याची तरतूद करणे आवश्यक आहे. जेणेकरून राज्यात अशा घटना होणार नाही .

2)लतेश्वरी काळे

…फाशीच्या शिक्षेची तरतूद व्हावी

– महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसागणिक वाढलेल्या आहे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक ठेवण्यासाठी शासनाने कठोर कायदे करावे .चिमुरडीवर केलेला अत्याचार अत्यंत घृणास्पद आहे अशा गुन्हेगारांवर फाशीची शिक्षेची तरतूद शासनाने करावी

3)वनिता काशिनाथ प्रधान

– महिला सुरक्षित नाही ,घटनेचा निषेध

– देशासह राज्यातील विविध भागात महिला व मुलीवर वाढलेल्या अत्याचाराच्या घटना महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहे.महिलावर होणारे अत्याचार थांबवायचे असेल तर कडक कायद्यांनव्ये कारवाई होणे आवश्यक आहे.जेणेकरून अशा घटना करण्यास गुन्हेगार धजावणार नाही.बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध करते.

4)कुसुम खोब्रागडे

– नराधमांना कठोर शिक्षा व्हावी

–बदलापूर येथील एका शाळेत लहान मुलीवर झालेली अत्याचाराची घटना अत्यंत घृणास्पद ,क्लेशकारक आणि संतापजनक आहे.या घटनेतील आरोपीना कठोर शिक्षा व्हावी व राज्यात होणाऱ्या अशा घटना पुन्हा होणार नाही यासाठी हे प्रकरणं जलदगती न्यायालयाकडे चालवून तात्काळ आरोपीस शिक्षा करावी.

5)ऍड सुलेखा कुंभारे

– न्यायालयीन व्यवस्थेत बदल होणे गरजेचे

– दिल्लीतील निर्भया आणि कोलकत्ताचे महिला डॉक्टर आणि त्यावरून काही दिवस जात नाही तोच बदलापूर येथे ही घटना दुर्दैवी घडली आहे.निर्भयाच्या घटनेनंतर अशी घटना व्हायला नको होती मात्र न्याय पालिकेकडून उशिरा होणाऱ्या निर्णयामुळे आरोपींचे मनोधर्या वाढते आणि अशा अघटित घटना घडतात .महिला सुरक्षेसाठी न्यायालयीन व्यवस्थेत बदल होणे गरजेचे आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भालेराव महाविद्यालयात "विद्यार्थी संवाद" संपन्न

Thu Aug 22 , 2024
सावनेर :- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या राज्यस्तरीय उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थी संवाद अभियान राज्यभर सुरु आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी संवाद मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. पराग निमिशे यांनी भूषविले. तसेच प्रमुख अतिथी यशवंत शितोळे, अध्यक्ष म. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com