अंबाळा तिर्थक्षेत्र विकासाच्या प्रतिक्षेत – चौकसे

– मॉ गंगा दशहरा दिप महोत्सवप्रसंगी चंद्रपाल चौकसेंचे उद्गार

– हजारो दिपांनी उजळून निघाला अंबाळा तलाव

– महोत्सवादरम्यान हजारो नागरीकांची गर्दी

रामटेक :- प्रख्यात अंबाळा तिर्थक्षेत्र येथे आज दि.३० मे च्या सायंकाळी ‘ माॅ गंगा दशहरा दिप महोत्सव ‘ मोठ्या थाटात व उत्साहात पार पडला. यावेळी येथे मॉ गंगेची आरती व विविध धार्मीक कार्यक्रम पार पडले. दरम्यान हजारो दिपक अंबाळा तलावात सोडण्यात आले होते. हे दृष्य पहाता हजारो दिपकांच्या प्रकाशात अवघा अंबाळा तलाव अक्षरशः उजळुन निघाल्याचे चित्र नागरिकांना पहावयास मिळाले. याप्रसंगी पर्यटक मित्र तथा भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी मंचावरून दोन शब्द बोलतांना अंबाळा तिर्थक्षेत्र विकासाच्या प्रतिक्षेत असुन या तिर्थक्षेत्राचा विकास झाल्यास फॉरेन वरून लोक येथे येतील व परिणामस्वरूप येथील लोकांना मोठा रोजगार मिळेल असे ते म्हणाले.

भारतीय जनसेवा मंडळ रामटेक, माॅ गंगा दशहरा दिप महोत्सव समिती, श्री क्षेत्र अंबाळा ब्राह्मण वृंद तसेच अंबाळा व रामटेक येथील भावीक भक्तगण तथा नागरीकांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र अंबाळा येथे काल दि. ३० मे ला सायंकाळच्या सुमारास ‘ माॅ गंगा दशहरा दिप महोत्सव ‘ चे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी ब्राम्हणवृंदांकडुन मॉ गंगेची विधीवत पुजा अर्चना झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्काराचा कार्यक्रम झाला. यानंतर मान्यवरांना दोन शब्द बोलण्याची संधी देण्यात आली. त्यात चंद्रपाल चौकसे बोलत होते. यानंतर भारतीय जनसेवा मंडळाचे सचिव तथा माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर भारतीय जनसेवा मंडळाचे ऋषिकेश किंमतकर यांचे प्रास्ताविक भाषण झाले. त्यानंतर माॅ गंगेची आरती करण्यात आली. यावेळी आरतीचा ध्वणी संपुर्ण परीसरात गुंजुन राहालेला होता. सरतेशेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. सुत्रसंचालन मोहन कोठेकर तथा अमोल गाढवे यांनी केलेले होते. यावेळी उपस्थितांमध्ये भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, सचिव मल्लीकार्जुन रेड्डी, संत तुकाराम बाबा, महंत कैलास पुरी महाराज, शिवानंद महाराज, महंत विष्णुगिरी महाराज, मनोज योगी महाराज, ऋषिकेश किंमतकर, डॉ. अंशुजा किंमतकर, पोलिस निरीक्षक हदयनारायण यादव, गोपी कोल्हेपरा, ज्योती कोल्हेपरा, नाना उराडे, विवेक तोतडे, शेखर बघेले, मोहन कोठेकर, नंदकिशोर पापडकर, प्रभाकर खेडकर, संजय बिसमोगरे, अजय खेडगरकर, नलीनी चौधरी, माकडे , पुंड, मनोहर बावनकर, पुरुषोत्तम मानकर तथा शेकडो महिला पुरुष बालगोपाल उपस्थीत होते.

अंबाळा तिर्थक्षेत्राचा विकास का नाही – चौकसे

अंबाळा सारख्या तिर्थक्षेत्राचा पाहीजे तशा प्रमाणात व पाहीजे तशा पद्धतिने विकास का म्हणुन करण्यात येत नाही तेच कळेनासे झाले आहे असे म्हणत चंद्रपाल चौकसे यांनी अंबाळा तिर्थक्षेत्र हे संपुर्ण विदर्भात तथा देशात प्रख्यात असुन येथे दुरवरून लोकं येतात परंतु पाहीजे तशा सोयी सुविधा येथे त्यांना मिळत नसल्याचे वास्तव असल्याचे सांगीतले. फॉरेन चे लोकं येथे यायला लागले तर नक्कीच येथील लोकांच्या हाताला काम मिळेल. छोटे दुकानदार, ऑटोवाले तथा स्थानिक नागरीकांना नक्कीच याचा फायदा होईल असे परखड मत त्यांनी याप्रसंगी मांडले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

Thu Jun 1 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार ता.31) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. विवेका हॉस्पीटल, त्रिमुर्ती नगर, नागपूर यांच्यावर सामान्य कचऱ्यासह जैव वैद्यकीय कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला.धरमपेठ झोनच्या उपद्रव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!