विनाकारण उन्हात निघणे टाळा, आरोग्याची काळजी घ्या

– तापमान वाढल्याने उष्माघाताचा धोका

नागपूर :- नागपूर शहरातील तामपानात सातत्याने वाढ होत आहे. तापमान 42 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. विनाकारण उन्हात निघणे टाळावे, याशिवाय उष्माघात प्रतिबंधक नियमांचे पालन करून प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपा तर्फे करण्यात आले आहे.

सध्या नागपूर शहरातील तापमान ४१ अंशाच्या वर पोहोचले आहे. शिवाय येणा-या दोन तीन दिवसांत ते ४३ अंशाच्या वर राहण्याचा अंदाज हवामान विभागाद्वारे वर्तविण्यात आलेला असल्यामुळे उष्माघाताचा धोका जास्त संभावतो. नागरिकांनी कामाशिवाय उन्हात निघण्याचे टाळावे. उन्हात जाण्याचे वेळ आल्यास योग्य खबरदारी घेतली जावी. उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, स्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी, हलकी, पातळ व सच्छिद्र कपडे वापरावीत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बूट किंवा चप्पलचा वापर करावा, प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा. ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकणे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमीत पिणे, घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, पंखा, कुलर आदींचा वापर करावा, असेही आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या निर्देशानुसार मनपा आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.

उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे, उन्हात कष्टाची कामे करणे टाळा, लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका, गडद, घट्ट व जाड कपडे परिधान करणे टाळावे, उन्हात स्वयंपाक करणे टाळावे, स्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत, मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळावी, शिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळा, असे आवाहन आरोग्य विभागाद्वारे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जंगली हत्ती पासून सावध राहा वन विभागाकडून नागरिकांना सूचना

Sat May 4 , 2024
गडचिरोली :- भामरागड वन परिक्षेत्रातील जंगली हत्ती पुढे छत्तीसगढ राज्यातील जंगलात जाण्याची शक्यता असून त्यांचे द्वारे कोणतीही जिवीत हानी होवु नये म्हणुन गावकऱ्यांनी घराच्या बाहेर एकटे रात्री अपरात्री निघू नये व हत्ती दिसल्यास त्याची छेडखानी न करता त्याबाबत तात्काळ वन विभागास कळवावे, असे उपवनसरंक्षक भामरागड वन विभाग यांनी कळविले आहे. दिनांक २५ एप्रिल रोजी वन परिक्षेत्र गट्टाचे कार्यक्षेत्रात वन्य प्राणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com