अवंती होमियोपैथी क्लीनिक मधे साजरा झाला जागतिक होमियोपैथी दिवस

संदीप कांबळे, कामठी

कामठी ता प्र 10:-होमियोपैथी चे जनक डॉ सैम्युअल हैनिमन ह्यांचा जन्मदिवस जागतिक होमियोपैथी दिवस म्हणून आज येथील अवंती होमियोपैथी क्लीनिक जयस्तंभ चौक कामठी येथे होमियोपैथी डॉक्टरांनी साजरा केला. डॉ हैनिमन यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी जर्मनीच्या मीसेन या गावात झाला. त्यांनी एम डी झाल्यानंतर वैद्यकीय सराव सुरु केला, अभ्यासु असल्यामुळे त्यांना अवगत झाले की एखाद्या जुनाट व्याधीने ग्रस्त असलेला रोगी नेहमी नेहमी औषधे घेण्यास येतो , त्यांनी ह्यावर अभ्यास करून 1790-1796 दरम्यान सलग प्रयोग करून होमियोपैथी चा शोध लावला. ह्यामुळे कित्येक जुनाट आज़ार, व्याधी होमियोपैथी औषधाँनी बरी केली, होमियोपैथी भारत सारख्या विकसनशील देशात नितांत आवश्यकता असून कोणताही साइड इफ़ेक्ट न होता कमी खर्चात आम्ही इलाज करतो अशे ह्यावेळी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी केले, ह्यावेळी डॉ घनश्याम मूंधड़ा, डॉ. विवेक चंदनानी, डॉ. प्रकाश चकोले, डॉ महेश महाजन, डॉ आफताब नागानी, डॉ प्रकाश सुपारे, डॉ राजबीर कौर, डॉ. राधिका रथकंठीवार, डॉ. निखिल अग्निहोत्री, डॉ. गिरीश गवते,इत्यादि होते. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ विवेक चंदनांनी तर आभार प्रदर्शन डॉ महेश महाजन हयांनी केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

Mon Apr 11 , 2022
 भूमी अभिलेख विभागाचा भूमापन दिन  व 53 व्या केंद्रीय वार्षिक आमसभा उत्साहात  नागपूर-अमरावती विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती  नागपूर : लोकांशी निगडीत मालकी हक्क नमूद करणारे अभिलेखे ठेवणारा भूमी अभिलेख हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे. राजेशाही व ब्रिटीशांच्या कालखंडात तसेच स्वातंत्र्योत्तर काळापासून भूमापनाचे व अभिलेख जतन करण्याचे काम या विभागाकडून केल्या जाते. महसूल गोळा करुन राज्याच्या विकासकामांना गती देण्याचे काम विभागाव्दारे होत असल्याने या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com