संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी पारशीवनी:- पारशीवनी तालु्यातील पालोरा येथे बाल गणेश उत्सव मंडळ कुणबी मोहल्ला चे वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा हाडपक्या गणपती उत्सव दैनंदिन विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. आज २३ सप्टेंबर ला सकाळी दहा वाजल्यापासून गणपतीचे विसर्जन प्रसंगी भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. गावात विविध मार्गाने मिरवणूक काढून डी.जे.ढोल ताशांच्या गजरात तल्लीन होऊन महिला व पुरुष […]

नागपूर :-  2 ऑक्टोबर पर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या बार्टी अंतर्गत सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता प्रस्ताव पाठविणे व ऑनलाईन पध्दतीने जात वैधता प्रमाणपत्र सुलभ रितीने कसे प्राप्त करावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. 20 सप्टेंबर रोजी […]

महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – डॉ. विपीन इटनकर नागपूर :-  राज्यात अठरा वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या नवरात्रौत्सव कालावधीत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्हास्तरावर सर्वरोग वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त […]

नागपूर :- कोरोना काळात बंद झालेल्या रेल्वे गाड्यांमुळे सर्वसामान्य नागरीक, छोटे व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग यांना मोठ्या प्रमाणात झळ पोहचली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन देऊन काटोल आणि नरखेड येथील थांबे पूर्ववत सुरू करण्यासाठी निवेदने देण्यात आली होती तसेच भाजपा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले व सतत पाठपुरावाही केला अखेर […]

विश्वशांती सरोवर येथे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम नागपूर :-  माणसाच्या शरीराची स्वच्छता आंघोळीने होईल. मात्र, मनाची स्वच्छता, शुद्धता करण्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारीमार्फत देशभर कार्य सुरू आहे. या ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या राजयोगी शिक्षिका -शिक्षक देशभर संस्कारी पिढया निर्माण करण्याचे कार्य करतात. याचा आम्हाला अभिमान आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात या संस्थेच्या कार्याचे […]

विदर्भ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे तीन दिवसीय आयोजन पहिल्यांदाच नागपूरात. नागपूर :- भारतीय सिनेयुग प्रोडक्शन अकादमी मुंबई व विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ३ दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. दि. 23 सप्टेंबरला सकाळी ९ ते सायंकाळी ६ या दरम्यान कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रगती पाटील यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योगपती युवराज आटोने प्रामुख्याने उपस्थित राहतील. सिनेमा प्रदर्शन […]

नागपूर :- वीज बिलाची थकबाकी वसुली करणाऱ्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यास मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली असून या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी प्रथम अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. परंतु नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके व अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. त्यानंतर आरोपी निलेश लहुजी नागपुरे याच्या विरुद्ध […]

नागपूर जिल्ह्यात करणार 5000 युवकांची नोंदणी – युवा प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे नागपूर :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकताच मेक इंडिया नं. 1 मोहिमेची सुरुवात केली. देशभरातील युवकांना यामध्ये जोडण्याच्या हेतूने ‘आप’ युवा आघाडीच्या वतीने युथ विथ मेक इंडिया नंबर 1 मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात 5000 युवकांना या अभियानात सामील करणार असल्याचे ‘आप’ युवा […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  पुराडा येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात गोंदिया :- जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पुराडा येथे आज केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धेला सुरुवात झाली त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना आमदार सहेसरामजी कोरोटे यांनी शिक्षकांना भाऊक होऊन आव्हान करीत सांगितले की आदिवासी विद्यार्थ्यांना खेळासोबतच उच्च दर्जाचे शिक्षण द्या गुरुजी, माझ्या आदिवासी विद्यार्थ्यांना डॉक्टर,आय.टी. इंजिनिअर आणि उच्च पदावर गेलेले […]

चंद्रपूर :-  चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे स्वच्छता अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असुन विविध उपक्रम या पंधरवाड्यात राबविण्यात येत आहेत. स्वच्छता कार्याला सहयोग म्हणुन मनपाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय व रयतवारी मराठी शाळेला टाकाऊ वस्तुंपासून बनविलेले प्लास्टीक बेंच व प्रत्येकी एक प्लास्टिक वेस्ट कलेक्शन डस्टबिन सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या इनरव्हील क्लब ऑफ चांदा फोर्टतर्फे देण्यात आले. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १७ सप्टेंबर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -शेकडो विपस्वी साधकांनी घेतला सहभाग जगातील वर्तमान स्थितीत मनाच्या शांतिकरिता विपस्यना गरजेचे – ऍड सुलेखा कुंभारे कामठी :- आजचे स्पर्धेचे युग असल्याने जगातील प्रत्येक व्यक्ती अक्षरशा धावत आहे ज्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत.त्यावर उपाय करायचा असेल तर मानवी शांती हवी आणि हीच मानवी शांती हवी असेल तर विपस्यना ध्यान भावन करणे गरजेचे आहे. कामठी येथील […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- ओबीसी महासंघातर्फे नुकतेच खरबी येथील गुरुदेव संस्कार भवन येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार समारंभ आणि ओबीसी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आले होते. यावेळी शाहीर ,सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र भीमराव बावनकुळे यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघ नागपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे,जिल्हा अध्यक्ष राजू चौधरी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष गुनेश्वर […]

नागपुर :-  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय पत्रकारिता विभाग के छात्रों ने आज मेट्रो भवन का शैक्षणिक भ्रमण किया. शिक्षकों के साथ स्नातक और स्नातकोत्तर पाठ्यक्रमों के लगभग 25 छात्रों ने दौरा किया । इस अवसर पर महा मेट्रो नागपुर के जनसंपर्क विभाग के अधिकारियों ने छात्रों को परियोजना की विस्तृत जानकारी दी । छात्रों को मेट्रो भवन में प्रायोगिक […]

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी आज मेट्रो भवनला शैक्षणिक भेट दिली. स्नातक आणि स्नातकोत्तर अभ्यासक्रमाच्या सुमारे २५ विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत आजचा हा दौरा केला. यावेळी महा मेट्रो नागपूरच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना इंथंभूत माहिती दिली. मेट्रो भवनमधील अनुभूती केंद्र, प्रदर्शनी, ग्रंथालय, गुंज ऑडिटोरिअम, कंट्रोल सेंटर, परिचालन नियंत्रण कक्ष (ओसीसी), गॅलरी, कॉन्फरन्स हॉल या विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. नागपूर […]

नागपूर :- पाली भाषा ही भारतीय संस्कृतीची मूळ भाषा आहे. मात्र या भाषेवर सतत अन्याय होत आलेला आहे. भारतीय भाषांच्या विकासात पालीचे स्थान सर्वश्रुत असताना देखील जाणीव पूर्वक पाली भाषेबाबत अन्यायात्मक भूमिका सतत घेतली जाते. त्याकरिता एकजुटीने संघर्ष करण्याची गरज आहे. पाली भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे आणि यूपीएससी मध्ये पालीभाषा पुर्ववत सुरू करण्यात यावी या उद्देशाने पाली भाषे करिता पुन्हा […]

नागपूर :-  कोल वॉशरिजमुळे विद्युत प्रकल्पांना शुध्द व स्वच्छ कोळसा मिळतो. त्यामुळे पर्यावरण प्रदुषित होणार नाही. त्यासोबतच शुध्द कोळसा मिळल्यामुळे विद्युत उत्पादन निर्मितीमध्ये बचत होणार असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले. कन्हान जवळील गोंडेगाव कोल वॉशरिज भेट देवून पाहणी करतांना ते बोलत होते. आमदार आशिष जायसवाल, मॅगनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम.जे. प्रदीप चंद्रन, रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना […]

नागपूर :-  राज्य शासनाचे उद्योग संचालनालय मुंबई अंतर्गत येणाऱ्या नागपूर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत एक जिल्हा एक उत्पादन गुंतवणूक वृद्धी व्यवसाय सुलभीकरण निर्यात याविषयी दोन दिवसांची कार्यशाळा 23 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. एस. मुद्दमवार यांनी केले आहे. गुंतवणूक वृद्धी व्यवसाय सुलभीकरण निर्यात व एक जिल्हा एक उत्पादनाबाबत निर्यातदारांची ही […]

नागपूर :-  जिल्ह्यातील स्वयंरोजगार इच्छुक सुशिक्षित युवक-युवतीकरीता पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंरोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यात नागपूर जिल्ह्यातील सर्व महामंडळे तसेच शासनाचे विविध विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती एका छत्राखाली उपलब्ध होण्याकरीता स्वयंरोजगार मेळावा घेण्याचे योजिले आहे. हा मेळावा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर प्रशासकीय इमारत क्र. 2 मध्ये दुसरा माळा सिव्हील लाईन, नागपूर येथे 24 […]

नागपूर :-  आपल्या शेतातील मालाला जेव्हा भाव येईल तेव्हा विकता यावे यासाठी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना शासनाने सुरु केली आहे. या हंगामासाठी 1 ऑक्टोबरपासून शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ होत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन मंडळाने केले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याचा उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समित्यामार्फत […]

खाणबाधित क्षेत्रात मूलभूत सुविधा प्राधान्याने पुरवा नागपूर :-  राज्यात खनिज आधारित नवीन उद्योगांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी भूविज्ञान आणि खनिकर्म विभागाने राज्याच्या विविध भागात खनिज साठ्यांचा व्यापक स्वरुपात शोध घ्या तसेच त्या क्षेत्रात रोजगारनिर्मितीला प्राधान्य द्यावे, असे आदेश बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी आज दिल्या. भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com