– ड्रायव्हर वेल्फफेअर असोसिएशन च्यावतीने शुक्रवार दिनांक 12 जुलै रोजी पत्रकार भवन येथे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र चौबे यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
नागपूर :- कोराडी येथील थर्मल पॉवर स्टेशन कोराडीत सरकारी अधिकारी अशोक गभने यांच्या विरोधात पत्रपरिषद घेऊन माहिती दिली की, गभने हे गृहस्थ प्रत्येक चालकांकडून दरमहा पाच हजार रुपये घेत असतो. असा आरोप करित तसेच त्यांना नियमित करण्यासाठी लाखो रुपयाची मागणी करतो. गभने हे सरकारी अधिकारी असून एम्प्लॉईज कंजुमर सोसायटीचा संचालक म्हणून काम सांभाळतो आणि ड्रायव्हर लोकांवर दबाव टाकून, धमकावून, अनैतिक मार्गाने पैसे लुटण्याचा प्रयत्न करतो. मागील पाच वर्षापासून असाच प्रकार चालू आहे. गभणे यांनी प्रत्येक चालकांना एक एक लाख रुपयांची मागणी जबरदस्तीने करून धमकावत असतो तसेच सोसायटीतून गाडी सहित सदर चालकांना बाहेर काढण्याच्या धमक्या देत असल्यामुळे आतापर्यंत ड्रायव्हर लोकांना सहन करावे लागत आहे.
या चालकांचा समावेश मध्ये
1) संजय क्षत्रिय
2) सोनू नंदकिशोर यादव
3) भुमेश उरकुडाजी कटरे
4) हर्षल महादेवजी ताजने
या चालकांना अशोक गभने यांनी आर्थिक मार्गाने प्रताडित करून सोसायटी बाहेर काढण्याचा धमक्या देतो. कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली परंतु काहीच दखल घेतली नाही. सोसायटी मॅनेजमेंट सुद्धा दखल घेत नाहीत, लाचलुचपत विभागाने सुद्धा दखल घेतली नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त नागपूर यांच्याकडे पुराव्यानिशी निवेदन दिले गेले आहे. चालक कंटाळून गेलेत म्हणून न्याय न मिळाल्याने पत्रपरिषदेत धाव घेतली व अशोक गभने यांच्यावरील आरोप करित परिषदेत पत्रकारांना आप बीती सांगितली आणि आम्हाला न्याय मिळण्यात यावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली. यावेळी ड्रायव्हर वेल्फेअर असोसिएशन चे सहभागी पदाधिकारी महाराष्ट्र संघटन मंत्री दिनेश पाटील, जिल्हा अध्यक्ष सचिन चव्हरे उमरेड अध्यक्ष दीपक कोल्हे, कोराडी चे राजकुमार भाई, नागपूर मुख्य पदाधिकारी आकाश पंचभाई आदी सहभागी होते.