उमरेड :- मागील काही दिवासापासुन पोलीस स्टेशन उमरेड तसेच आजुबाजुच्या परीसरातुन दोन चाकी मोटार सायकल चोरून चोरटे धुमाकुळ घालीत होते. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पो.स्टे, उमरेडचे पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी मोटार सायकल चोर पकडण्यासाठी उमरेड पोलीस स्टेशनचे एक पथक तयार केले, उमरेड पोलीसांचे पथक मोटार सायकल चोरीच्या सबंधाने पोस्टे हद्दीत पेट्रोलीग करून धागेदोरे तपासत असताना पथकास गुप्त बातमीदार कडुन माहीती मीळाली की, मागील काही दिवसापासुन मंगळवारी पेठ उमरेड येथे राहणारा विक्की वसंता रामटेके वय २६ वर्ष, रा- कार मोहल्ला तिरोडा जि- गोंदीया, ह. मु. मंगळवारी पेठ उमरेड जि- नागपुर नावाचा ईसम मोटार सायकल विक्री करण्या करीता लोकांना विचारपुस करीत आहे. सदर ईसमावर पाळत त्याच्या बाबत खात्रीलायक माहीती गोळा करीत होती. विक्की रामटेके याच्या बाबत खात्रीशीर माहीती मीळाल्यानंतर त्यास ताब्यात घेतले असता त्याने प्रथमता उड़वा-उडविचे उत्तरे दिली त्याला विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्याने उमरेड शहर व आजुबाजुचे परीसरात मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले. त्यावरून त्याच्या ताब्यातुन एकुण पाच मोटार सायकली जप्त करण्यात आल्या जप्त करण्यात आलेल्या सर्व मोटार सायकल या होरो होन्डा स्प्लेंडर कंपनीच्या आहेत, या मोटार सायकल चोरीचे पोस्टे उमरेड, भिवापुर, कुही व बेला जि. नागपुर येथे प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे,
उघडकीस आलेले गुन्हे खालीलप्रमाणे: (१) पो.स्टे. उमरेड अप. क्र. ६०१/२०२३ (२) पो.स्टे. कुही अप. क्र. ७९६/२०२३ (३) पो.स्टे. भिवापुर अप. क्र. ४६३/२०२३ (४) पो.स्टे. बेला अप. क्र. ३९९/२०२३ (५) एक विना क्रमांकाची हीरो होन्डा स्प्लेंडर मोटार सायकलचा क्रमांकाचा व मालकाचा शोध लेणे सुरु आहे. तसेच या गुन्ह्याचे तपास दरम्यान इतरही मोटार सायकल चोरीच्या प्रकरणाबाबत महत्वाची माहीती उपलब्ध होवुन अधीक गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिश्चक डॉ. संदिप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार उमरेड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उमरेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, पोलीस अमंलदार गणेश गिरडकर, प्रदिप चवरे, रावेश्याम कांबळे, पंकज बट्टे, तुषार गजभीये, गोवर्धन शहारे, योगीराज वंजारी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.