ग्रामीण भागात बकरी चोरी करणारी अट्टल दोन टोळ्या जेरबंद तब्बल १५ गुन्हयाचा उलगडा एकुण ७,७२,५००/-रुपयाचा मुद्देमाल जप्त

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई)

नागपूर :- ग्रामीण घटकाअंतर्गत बकरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याकरीता नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात दोन विशेष पथके तयार केले. विशेष पथकाने जिल्हयातील विवीध पोलीस स्टेशनला नोंद गुन्हयांचा अभ्यास करुन प्रत्येक बकरी चोरीच्या घटनेमधील आरोपींच्या गुन्हे करण्याच्या कार्यपध्दतीवर केंद्र रुक्षीत करुन समांतर तपास सुरु केला, तपासादरम्यान प्राप्त तांत्रीक पुराव्यांच्या आधारे व गोपनिय मुख्याबराने दिलेल्या माहितीवरुन दि. २८/११/२०२३ रोजी कन्हान येथील तारसा रोड जवळ बकरी चोरी करणाऱ्या दोन टोळ्या चारचाकी वाहनासह जेरबंद केल्या ज्यामध्ये पहीली टोळी सोहेल अली याची असून १) सोहेल अली वल्द कादर अली वय २१ वर्ष, रा. कामगार नगर, भोलाराम किराणा स्टोअर्स जवळ, नारी रोड, नागपूर २) तस्लीम रजा उर्फ राजा वल्द शेख मक्सुद वय २२ वर्ष रा. तेजीया कॉलनी, टायर चौक, उपलवाडी, नागपूर आणि ३) अरबाज वल्द हमीद खान वय २३ वर्ष रा. ब्लॉक नं. ५०, क्वॉर्टर नं. ७८२, म्हाडा कॉलनी, नारी रोड नागपूर यांनी नागपूर ग्रामीण जिल्हयातील खालील पोलीस स्टेशन हद्दीत बकरी चोरी केल्याचे उघड झाल्याने त्यांचे कडून ०१ मोवाईल फोन, ०१ चारचाकी फोर्ड फियास्टा वाहन क्र. MH06 AS 7792 आणि रोख १,१२,५००/- रुपये असा एकुण ५,२२,५००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

१) पो.स्टे. रामटेक गुन्हे रजी.नं. ७३८/२०२३ कलम ३७९ भादवि २) पो.स्टे. रामटेक गुन्हे रजी.नं. ८२८/२०२३ कलम ३७९ भादवि ३) पो.स्टे. रामटेक गुन्हे रजी.नं. ८५३/२०२३ कलम ३७९ भादवि ४) पो.स्टे. कोंढाळी गुन्हे रजी.नं. ७३०/२०२३ कलम ३७९ भादवि ५) पो.स्टे. कोंढाळी गुन्हे रजी.नं. ७६४/२०२३ कलम ३७९ भादवि ६) पो.स्टे. कोंढाळी गुन्हे रजी.नं. ७८२/२०२३ कलम ३७९ भादवि ७) पो.स्टे. देवलापार गुन्हे रजी.नं. ४३१/२०२३ कलम ३७९ भादवि ८) पो.स्टे. परशिवनी गुन्हे रजी.नं. ३९४/२०२३ कलम ३७९ भादवि ९) पो.स्टे. MIDC बोरी गुन्हे रजी.नं. ३९७/२०२३ कलम ३७९ भादवि १०) पो.स्टे. खापा गुन्हे रजी.नं. ४७१/२०२३ कलम ३७९ भादवि

दुसरी टोळी रुपेश पाली याची १) रुपेश राजू पाली वय ३२ वर्ष रा. पवनी ले-आउट, डोरल्या काच कंपणी जवळ, पिवळी नदी, उपलवाडी, नागपूर आणि त्याचा साथीदार २) मुन्नी सरदार रा. यशोधरा नगर, नागपूर यांनी नागपूर ग्रामीण जिल्हयातील खालील पोलीस स्टेशन हद्दीत बकरी चोरी केल्याचे उघड झाल्याने त्यांचे कडून ०१ मोबाईल फोन, ०१ वाहन शेवलेट कंपणी स्पार्क वाहन क्र. MH 43 AJ 2129 आणि रोख ५०,०००/- रुपये असा एकुण २,५५,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

१) पो.स्टे. रामटेक गुन्हे रजी.नं. ७५९/२०२३ कलम ३७९ भादवि

२) पो.स्टे. रामटेक गुन्हे रजी.नं. ७७४/२०२३ कलम ३७९ भादवि ३) पो.स्टे. रामटेक गुन्हे रजी.नं. ८४१/२०२३ कलम ३७९ भादवि

४) पो.स्टे. खापरखेडा गुन्हे रजी.नं. ६३७/२०२३ कलम ३७९ भादवि

५) पोटे. खापरखेडा रजी.नं. ६६०/२०२३ कलम ३७९ भादवि

वरील दोन्ही टोळीतील सदस्यांकडून एकुण ७,७७,५००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून नागपूर ग्रमीण जिल्हयातील बकरी चोरीचे एकुण १५ गुन्हे उघडकीस आले आहे.

वरील दोन्ही टोळीतील आरोपी हे बकरी चोरी करण्यापुर्वी ग्रामीण भागात जावून टेहाळणी करायाचे व मध्यरात्रीच्या वेळी संधी मिळताच त्यांचे जवळील चारचाकी वाहनात बकच्या टाकुन चोरी करायचे या दोन्ही टोळींनी नागपूर ग्रामीण हद्दीत गोरगरीबांच्या बकच्चा चोरी करुन त्यांचे आर्थीक नुकसान करण्यान्या अक्षरशः धुमाकूळ घातला होता, अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकांनी रात्रदिवस अथक परिश्रम करुन अतिशय कौशल्यपुर्ण समांतर तपास केला व आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोहार व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरीक्षक, राजीव कर्मलवार, आशिषसिंह ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक बदूलाल पांडे, सहा, फौजदार ज्ञानेश्वर राऊत, पोलीस हवालदार दिनेश आधापूरे, विनोद काळे, इंक्वाल शेख, रोशन काळे, प्रमोद भोयर, शंकर महावी, उमेश फुलवेल, नितेश पिपरोदे, संजय भदोरिया, चालक पोलीस हवालदार अमोल कुथे, मुकेश शुक्ला तसेच सायबर सेलचे पोलीस नायक सतिष राठोड, स्नेहलता ढवळे, यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

टाटा सुमो चोरी करणारा आरोपी अटकेत

Thu Nov 30 , 2023
मौदा :- दिनांक २८.११.२०२३ रोजी पोलीस स्टेशन मौदा अपराध क. ३२४/२३ कलम ३७९ भादवि चे गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेतला असता मुखबीर द्वारे खबर मिळाली कि, सदर गुन्हा हा यादव नगर, नागपुर येथे राहणारा रामकृष्ण केने याने केला आहे. यावर सदर आरोपी यास यादव नगर, नागपूर येथुन ताब्यात घेवुन सदर गुन्हयात चोरी गेलेली टाटा सुमो बाबत विचारपुस केली असता सदर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com