– तब्बल २७ गुन्हयाचा उलगडा एकूण २६,७०,१५० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त
-स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई
नागपूर :- नागपूर ग्रामीण घटकाअंतर्गत मोबाईल टॉवर बॅटरी चोरी करणाच्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याकरीता नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात दोन विशेष पथके तयार केले. विशेष पथकाने जिल्हयातील विवीध पोलीस स्टेशनला नोंद गुन्हयांचा अभ्यास करून प्रत्येक चोरीच्या घटनेमधील आरोपींच्या गुन्हे करण्याच्या कार्यपध्दतीवर केंद्र लक्षीत करून समांतर तपास सुरु केला. तपासा दरम्यान प्राप्त तांत्रीक पुराव्यांच्या आधारे कोंढाळी येथे रहाणारा संशयीत आरोपी कलीम उर्फ अलीम शेख वल्द मेहबुब शेख, वय ३४ वर्ष, रा. व्दारा फिरोजभाई सलीम गरेवाले, उमाठे नगर, कोंढाळी जि. नागपूर आणि त्याचा साथीदार नजीम उर्फ अकलाक युसूफ पठाण वय २६ वर्ष, रा. वार्ड नं. २ विकास नगर, कोंढाळी जि. नागपूर या दोघांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी हे “गावाचे किंवा शहराचे बाहेरील निर्जन स्थळी बसविण्यात आलेले मोबाईल टॉवरची टेहाळणी करुन मध्यरात्रीचे वेळी मोबाईल टॉवरचे डोअर लॉक तोडून ओडीसी रॅक मधील costlight / VRLA बॅटरीज्चे केवल कटर, पेचकस व पानाचे सहाय्याने तोडायचे व बॅटरी चोरी करुन चारचाकी वाहनामध्ये घेवून जात होते.” दोन्ही आरोपी हे चोरी केलेल्या बॅटरीज् कोंढाळी येथे राहणारा कबाड़ी फारूख शेख वल्द नूर शेख वय ३८ वर्ष, रा. वार्ड नं. ५ बुधवार पेठ, कोंढाळी जि. नागपूर याला विकत होते. फारूख शेख हापुढे त्या बॅटरीज् अमन वल्द मेहराजउद्दीन मलीक, वय २२ वर्ष, रा. गल्ली नं. ५, चमन पार्क मुस्तफाबाद दिल्ली. ह.मु. व्दारा कुरैशी, अन्सार नगर, मोमीनपुरा नागपूर याला विकायचा. अमन मलीक हाcostlightवॅटरीज् रेल्वे कुरीयर व्दारे दिल्ली येथील त्याच्या इतर साथीदारांना पाठवित होता. तसेच काही बॅटरीज् त्याने सुशिल जमुनाप्रसाद शाहु वय ३० वर्ष रा. बिनाकी मंगळवारी, शाह मोहल्ला, नागपूर याला विकल्याचे समोर आले. तपासा दरम्यान आरोपीतांकडून Costlight बॅटरीज, ७२VRLA बॅटरी ३ चारचाकी वाहने आणि ०५ मोबाईल फोन असा एकुण २६,७०,१५०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वरील आरोपी हे एकमेकांचे संपर्कात रहायचे त्यांनी संगणमताने टोळी तयार करून खालील नमुद पोलीस स्टेशन हद्दीत फेब्रुवारी २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत रिलायन्सजीयो कंपणीचे मोबाईल टॉवर व इंडस कंपणीचे मोबाईल टॉवरच्या बॅटरीज चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस स्टेशन कळमेश्वर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकाव्दारे सुरु असुन खालीलप्रमाणे नागपूर ग्रामीण मधील एकुण २० गुन्हे, नागपूर शहरातील २ गुन्हे व वर्धा जिल्हयातील ५ गुन्हे असे एकुण २७ गुन्हे उघडकीस आणलेले आहे.
१) पो.स्टे. कळमेश्वर गुन्हे रजि. नं. २५१/२०२३ कलम ३७९ भादवि.
२)पो.स्टे. कळमेश्वर गुन्हे रजि. नं. २७२ / २०२३ कलम ३७९ भादवि.
३)पो.स्टे. कोंढाळी गुनो रजि. नं. ५४ / २०२२ कलम ३७९ भादवि. ४) पो.स्टे. कोंढाळी गुन्हे रजि. नं. ५८/२०२२ कलम ३७९ भादवि.
५) पो.स्टे. कोंढाळी गुन्हे रजि. नं. १०७/२०२३ कलम ३७९ भादवि.
६)पो.स्टे. कोंढाळी गुन्हे रजि. नं. १४७ / २०२३ कलम ३७९ भादवि.
७)पो.स्टे. कोंढाळी गुन्हे रजि. नं. ५८८/२०२३ कलम ३७९ भादवि.
८) पो.स्टे. काटोल गुन्हे रजि. नं. ३४३/२०२२ कलम ३७९ भादवि.
९) पो.स्टे. काटोल गुन्हे रजि.नं. ४१९ / २०२२ कलम ३७९ भादवि.
१०) पो.स्टे. काटोल गुन्हे रजि. नं. २३३ / २०२३ कलम ३७९ भादवि
११) पो.स्टे. काटोल गुन्हे रजि. नं. ४९५ / २०२३ कलम ३७९ भादवि.
१२) पो.स्टे. जलालखेडा गुन्हे रजि. नं. ४७५/२०२२ कलम ३७९ भादवि.
१३) पो.स्टे. जलालखेडा गुन्हे रजि. नं. १२९ / २०२३ कलम ३७९ भादवि.
१४) पो.स्टे. नरखेड गुन्हे रजि. नं. ३३ / २०२२ कलम ३७९ भादवि.
१५) पो.स्टे. नरखेड गुन्हे रजि. नं. १२३/२०२३ कलम ३७९ भादवि.
१६) पो.स्टे. कुही गुन्हे रजि. नं. ११२ / २०२३ कलम ३७९ भादवि.
१७) पो.स्टे. मौदा गुन्हे रजि. नं. ५८१ / २०२२ कलम ३७९ भादवि.
१८) पो.स्टे. मौदा गुन्हे रजि. नं. ५८२/२०२२ कलम ३७९ भादवि
१९) पो.स्टे. मौदा गुन्हे रजि. नं. ६५ / २०२३ कलम ३७९ भादवि.
२०) पो.स्टे. मीदा गुन्हे रजि. नं. २६२ / २०२३ कलम ३७९ भादवि.
२१) पो.स्टे. हिंगणा, नागपूर शहर गुन्हे रजि. नं. ३७२ / २०२३ कलम ३७९ भादवि
२२) पो.स्टे. वाडी, नागपूर शहर गुन्हे रजि. नं. ३९३ / २०२३ कलम ३७९ भादवि
२३) पो.स्टे. तळेगांव, वर्धा गुन्हे रजि. नं. १९१ / २०२३ कलम ३७९ भादवि.
२४) पो.स्टे. पुलगांव, वर्धा गुन्हे रजि. नं. २८६ / २०२३ कलम ३७९ भादवि.
२५)पो.स्टे. हिंगणघाट, वर्धा गुन्हे रजि. नं. ४१२ / २०२३ कलम ३७९ भादवि.
२६) पो.स्टे. हिंगणघाट, वर्षा गुन्हे रजि. नं. ५२४ / २०२३ कलम ३७९ भादवि.
२७) पो.स्टे. देवळी, वर्षां गुन्हे रजि. नं. १३६ / २०२३ कलम ३७९ भादवि.
सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अवीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरीक्षक, राजीव कर्मलवार, अनिल राऊत, सहा फौजदार चंद्रशेखर मडेकर, पोलीस हवालदार दिनेश आधापूरे, ज्ञानेश्वर राऊत, प्रमोद तभाने, निलेश बर्वे, इक्बाल शेख, आशिष भुरे, पोलीस नायक प्रमोद भोयर, नितेश पिपरोदे, जित जाधव, विपीन गायधने, उमेश फुलबेल, निलेश इंगुलकर, चालक पोलीस हवालदार अमोल कुथे, पोलीस नायक मुकेश शुक्ला तसेच सायबर सेलचे पोलीस नायक सतिष राठोड यांनी पार पाडली. सध्या सदर गुन्हयाचा तपास पोलीस स्टेशन कळमेश्वरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नावेद खान, पोलीस शिपाई मनिष सोनवने हे करीत आहे.