अरोली :- धानला – चिरव्हा या जि प क्षेत्र व धानला पं स गण अंतर्गत येणाऱ्या दहेगाव येथे नुकतेच चार दिवसीय सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कलंगी मंडळ दहेगाव द्वारा नवअंकी नाट्यपुष्प भाऊबीज उर्फ पती को फासी या नाटकाच्या माध्यमातून समाजातील अनैतिक रूढी, परंपरा व अंधश्रद्धेवर प्रहार करण्यात आले.
तालुका व जिल्हा भंडारा मु. पिंडकेपार ,पो. बेला येथील कलावंत अशोक माणिक हटवार यांनी नाटकात साधूची भूमिका करून अंधश्रद्धेबाबत उपस्थित प्रेक्षक वर्गांना मोलाचे मार्गदर्शन केले. दहेगाव येथील भगवान आंबिलढुके ,नीलकंठ आंबिलढुके, बलदेव आंबिलढूके ,नरेश हटवार, प्रकाश आंबिलढुके, शेखर आंबिलढुके, इस्तारू आंबीलढूके व मोतीराम नागपुरे सह इतर कलावंतांनी विविध भूमिका उत्कृष्टरित्या साकारून प्रेक्षक वर्गाचे समाज प्रबोधन व मनोरंजन केले.