कामठी ता प्र 30 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लकडगंज मस्जिद जवळ एका लिलू नामक तरुणाने एका तरुणास अश्लील शिवीगाळ देत,धमकी देऊन दगडाने डोक्यावर मारून जख्मि केल्याची घटना काल रात्री 9 दरम्यान घडली असून जख्मिचे नाव शेख शफीक मौनू शेख वय 31 वर्षे रा बाबा अब्दुल्लाहशाह दरगाह जवळ,कामठी असे आहे.यासंदर्भात फिर्यादी जख्मि तरुणाने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी लिलू नामक तरुणाविरुद्ध भादवी कलम 324,504,506 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
लकडगंजात दगडाने मारून तरुणावर हल्ला..
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com