संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- योगाभ्यासाच्या माध्यमातून शिक्षित, सुसंस्कृत व स्वस्थ नागरिक , युवक घडविण्यास तसेच योगाचा प्रचार व प्रसार होण्यास मदत व्हावी या मुख्य उद्देशाने 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कामठीच्या पंचायत समिती सभागृहात सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले यांच्या मुख्य उपस्थितीत सामूहिक योग साधना घेण्यात आली.याप्रसंगी आरोग्य विस्तार अधिकारी मनीष दीघाडे यांनी योग केल्याने शारीरिक व मानसिक व बौद्धिक विकास होत तसेच मधुमेह, उच्चरक्तदाब इत्यादी रोगापासून मुक्त मिळत असल्याचे मनोगत व्यक्त करीत योगाचे महत्व विषद करून दिले.
याप्रसंगी विस्तार अधिकारी गोपीचंद कातुरे,अरुण मंगरुळकर,सदाशिव राठोड,जयश्री कामडी, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.