संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र – कामठी तालुक्यातील खैरी ग्रामपंचायत येथे हत्तीरोग दुरीकरण मोहिमेला आरोग्य विभागाचे वतीने सुरुवात करण्यात आली हत्तीरोग दुरीकरण मोहीम महाराष्ट्रराज्य पुणे चे सहाय्यक संचालक डॉ.बबिता कामलापूरकर यांचे हस्ते दिपप्रज्वलन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी संचालक परिमंडळ नागपूर डॉ.शामसुंदर निमजे,नागपूर जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.मोनिका चारमोडे, कामठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय माने,प्राथमिक आरोग्य अधिकारी गुमथीचे डॉ.राहुल राऊत , सरपंच मोरेश्वर कापसे, उपसरपंच विना रघटाटे ,ग्रामविकास अधिकारी नीलकंठ देवगडे ग्रामपंचायत सदस्यांना नत्थु ठाकरे, दिलीप ठाकरे, हुदय सोनवणे, दीनेश मानकर, विजया शेंडे, प्रीती मानकर ,सुजाता डोंगरे ,माया कांनफाडे डॉ.वैशाली गोंनाडे वर्धिनी ,उपकेंद्र खैरी आरोग्य सेविका सुनीता नेवारे,आरोग्य सेवक तुषार मून,अंगणवाडी सेविका वनिता धोके,अंगणवाडी मदतनीस अरुणा तांडेकर उपस्थित होते. आरोग्य विभागाचे डॉक्टर व अधिकाऱ्यांनी गावाची पाहणी केली असता गावात स्वच्छता, रोड, नाल्या पाहून सरपंच मोरेश्वर कापसे व सहकार्याची प्रशंसा केली व गावकऱ्यांनी हत्तीरोग दुरीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले सरपंच मोरेश्वर कापसे यांनी सर्व आरोग्य अधिकारी, डॉक्टर यांचे ग्रामपंचायतच्या वतीने शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रदर्शन ग्राम विकास अधिकारी नीलकंठ देवगडे यांनी केले
.