स्नेहसदन विशेष मुलांची अनिवासी शाळा शितलवाडी येथे जागतिक दिव्यांग दिन सप्ताह साजरा

रामटेक  -समग्र शिक्षा – समावेशीत शिक्षण  पंचायत समिती रामटेक व स्नेहसदन मतिमंद मुलांची विशेष अनिवासी शाळा, शितलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने   दिनांक 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दीन सप्ताह निमित्य स्नेहसदन विशेष मुलांची अनिवासी शाळा शितलवाडी येथे जागतिक दिव्यांग दिन सप्ताह साजरा करण्यात आले . या कार्यक्रमाला प्रमुख अध्यक्ष म्हणून मा.डॉ. उन्मेश् आंभोरे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय सावनेर व प्रमुख पाहुणे आशिषजी जैस्वाल, आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र,  पंचायत समिती रामटेक च्या गटशिक्षणाधिकारी  श्रीमती संगीता तभाने, प्रमुख उपस्थित  अशोकजी उईके सर व शालिनी रामटेके मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती रामटेक तसेच  केंद्रप्रमुख केंद्र पिपरिया ,रामनाथ धुर्वे सर, विनोद शेंडे साधनव्यक्ती,प्रशांत जांभुळकर  शालेय आरोग्य तपासनी पथक चे वैद्यकीय अधिकारी प्रिया राउत व  स्नेहसदन शाळेचे मुख्याध्यापक पंकज पांडे व सर्व विशेष शिक्षक तसेच गट साधन केंद्र, पंचायत समिति रामटेक ची समावेशित शिक्षण चमू यांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमात चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा , रनिंग स्पर्धा, निबंध स्पर्धा व ईयता १० व १२ मधे उत्तीर्ण दिव्यांग विधार्थ्यांचे मनोगत व त्यांना पुरस्कार देवून त्यांना पुढील शिक्षण करिता शुभेच्या देण्यात आले. संचालन  मनीषा भोंडे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन सरोज सांगोडे, माजी लेखा वित्तअधिकारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता रजनी मानकर , रश्मी झाडे , संदीप गोडघाटे , संगीता धार्मिक,  प्रवीन महल्ले,प्रदीप बागडे, प्रीतम मानकर, सविता अतकर, प्रिया दुबे व पांडुरंग नागपुरे सर यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

नागपूर विद्यापीठाच्या इमारतीत मनपाचे अत्याधुनिक कोव्हिड हॉस्पीटल सज्ज

Sat Dec 4 , 2021
-महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली पाहणी : ‘ओमायक्रॉन’च्या संभाव्य धोक्यात ठरणार उपयुक्त नागपूर: कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या नव्या व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने आरोग्य सुविधा बळकट करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कोरोनाच्या संभाव्य धोक्यामध्ये प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर योग्य उपचार मिळावे यासाठी मनपातर्फे आरोग्यविषय सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर वि‌‌द्यापीठाच्या श्री जमनालाल बजाज प्रशासकीय इमारतीमध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com