भाजप तर्फे आशा सेविकांचा सत्कार..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 15 :- स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवा निमित्त कामठी शहरातील सर्व आशा सेविकांचा सत्कार व याेगा मॅट वाटप कार्यक्रम आमदार . टेकचंद सावरकर यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२२ राेजी सकाळी १०.३० वाजता तहसील कार्यालय कामठी येथे घेण्यात आला. या वेळी सर्व आशा सेविका यांनी काेराेनाच्या काळात अहोरात्र मेहनत घेऊन स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आपली जबाबदारी पार पाडली असा सर्व आशा सेविकांचे स्वास्थ उत्तम राहवे व त्यांनी राेज याेगा करावा याकरिता योगा मॅट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी तहसिलदार अक्षय पोयाम,प स कामठी सभापती उमेश रडके,भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया,भाजपा पदाधिकारी अनिल निधान,भाजपा महामंत्री उज्ज्वल रायबोले,माजी नगरसेवक लालसिंग यादव, माजी नगरसेविका सुषमा सीलाम, सुनिल खानवानी,पंकज वर्मा, विजय कोंडुलवार,राज हाडोती ,योगेश गायधने यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी येथील शैक्षणिक परिसरात ध्वजारोहण..

Mon Aug 15 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  नागपूर – देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव दिनानिमित्त श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी येथील शैक्षणिक परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती किशोरीताई भोयर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे सचिव सुरेश भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा  किशोरी भोयर, संस्थेचे सचिव सुरेश भोयर, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर, कामठी तंत्रनिकेतन चे प्राचार्य  मुकेश घोळसे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com