मोटार वाहन कायदा 1988 कलम 128 व 129 मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार दुचाकीस्वार व पिलीयन रायडर (मागे बसलेला इसम) यांनी सूरक्षेच्या दुष्टीने हेल्मेट घालने आवश्यक आहे.
परंतू दुचाकीस्वार व पिलीयन रायडर हेल्मेट घालत नसल्याने अपघाती मृत्यु तसेच जखमींच्या संख्येत वाढ होत आहे. करीता सदर कायद्याचे सक्तीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
तरी सर्व दुचाकी वाहन चालकांना याद्वरे आवाहन करण्यात येते की, वाहन चालवितांना स्वतः व पिलीयन रायडर (मागे बसलेला इसम) यांनी सूरक्षेच्या दुष्टीने हेलमेट परिधान करावे, अन्यथा वाहन चालकांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याअगोदर सुद्धा कारवाई करण्यात येत होती. परंतु यापुढे वाहतूक विभागाच्या वतीने नमूद मोटार वाहन कायदयाची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येणार असून नागपुर शहरात लावण्यात आलेल्या 4518 CCTV कॅमेन्याद्वारे व तैनात असलेले वाहतुक अधिकारी व अंमलदार यांचेकडुन सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे.
आपले व ईतरांचे सुरक्षीततेच्या दृष्टिने सर्व वाहतुक नियमांचे पालन करावे, दुचाकी वाहन चालवितांना स्वतः व मागे बसलेल्या इसमाने हेलमेट परिधान करून वाहतुक पोलीसांना सहकार्य करावे..