खेळांमुळे निर्माण होणारी खेळाडूवृत्ती महत्वाची महावितरणचे संचालक अरविंद भादिकर यांचे प्रतिपादन

– विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन

पुणे :- ‘खेळांमुळे खेळाडूवृत्ती व संघभावना निर्माण होते व हेच गुण महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कोणत्याही पराभवाला सामोरे जाऊन, त्यावर मात करून नवीन भरारी घेण्याची वैयक्तिक व सांघिक जिद्द निर्माण होते’, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादिकर यांनी बुधवारी (दि. २९) केले.

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४५ व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती व टेबल टेनिस क्रीडास्पर्धेला प्रारंभ झाला. संचालक अरविंद भादिकर यांच्याहस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर महापारेषणचे संचालक (प्रकल्प) अविनाश निंबाळकर, महानिर्मितीचे संचालक (मायनिंग) डॉ. धनंजय सावळकर, पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता राजेंद्र पवार, मुख्य अभियंता अनिल कोलप (महापारेषण), मुख्य अभियंता सुनील पावडे (महावितरण) व अधीक्षक अभियंता संजय भागवत (महानिर्मिती), मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके (महावितरण) व पुरुषोत्तम वारजुरकर (महानिर्मिती), अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाचे अध्यक्ष जिग्नेश रे, सरचिटणीस नरेश कुमार, उपाध्यक्ष भारत पाटील, खजीनदार ललित गायकवाड यांची उपस्थिती होती.

या राष्ट्रीय स्पर्धेत गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेशातील तसेच इतर खासगी अशा १४ वीज कंपन्यांचे ३० संघ व सुमारे ३७५ खेळाडू सहभागी झाले आहेत. शुक्रवारी (दि. ३१) या स्पर्धेचा समारोप होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमात सर्व खेळाडूंनी संचलन करीत पाहुण्यांना मानवंदना दिली. तसेच रवींद्र जगदाळे व सहकाऱ्यांनी शिवकालिन मैदानी खेळ सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्य अभियंता अनिल कोलप तर सूत्रसंचालन डॉ. संतोष पाटणी व रामगोपाल अहीर यांनी केले. संजय भागवत यांनी आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लष्करीबागेत अचानक जलवाहिनी तुटल्यामुळे पाण्यासाठी धावाधाव 

Thu May 30 , 2024
– दिनेश इलमे यांनी पाण्याचे टँकर बोलावून गरिबांना केली मदत  नागपूर :- लष्करीबाग प्रभाग क्र. 07 मधील नोगा फॅक्टरी परिसरातील मोठी जल वाहिनी तुटल्या कारणास्तव परिसरात 3 दिवस पाणी पुरवठा खंडित झालेला होता. परीसरातील नागरीकांनी दिनेश इलमे उपाध्यक्ष भाजपा उत्तर मंडळ ह्यांना आपली समस्या सांगितली त्यांनी त्वरित नोगा फॅक्टरी आणि भीम रत्न नगर परिसरात टँकर च्या माध्यमातून लोकांना पाणी मिळवून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com