चंद्रपुर – आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भ तसेच चंद्रपूर शहरासाठी काहीही विशेष तरतूद केलेली नाही. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची, तरुणांची आणि गृहिणींची घोर निराशा करणारा आहे,अशी प्रतिक्रिया महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिली.
मागील अर्थसंकल्पाच्या वेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित सरकार असताना तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र, विदर्भ आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी भरघोस तरदुत केली. मात्र, या अर्थसंकल्पात विदर्भावर अन्याय झाला आहे, अशी प्रतिक्रिया महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिली.