– स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई
नागपूर :- दिनांक १९/०८/२०२३ रोजी पोलीस स्टेशन मौदा परीसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असता मुखबीरद्वारे खबर मिळाली की, पीकअप महिंद्रा क्र. MH-४० / ४-०९६८ या वाहनाने बेकायदेशीरपणे गोवंश यांना त्यांच्ये चारा पाण्याची सोय न करता गाडी मध्ये कोंबून कत्तलीकरीता देवळी गोदिया मौदा मार्गे येथून नागपूर कडे वाहनात घेऊन जात आहे. यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा साधनी शिवारात टोल नाका भंडारा नागपूर हाईवे वर नाकाबंदी करून त्याला थांबविले असता सदर गाडीची पाहणी केली सदर वाहन क्रमांक MH-४० / ४-०९६८ चा चालक आरोपी नामे १) शेख सलीम शेख अकबर रा. मोमिनपुरा नागपूर २) मोहम्मद साकिब मोहम्मद नरूल्ला शेख, रा. उपलवाडी नागपूर फरार आरोपी ३) प्रेमलाल भैयालाल राऊत, रा. टाकळघाट नागपूर ४) शेख अल्तामस रा. पिवळीनदी नागपुर हे गाडीचे मागील डाल्यात १२ गोवंश क्रूरतेने कोंबून बांधुन वाहतूक करतांना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून १) महिंद्रा वाहन क्र. MH-४०/४-०९६८ किंमती ६ लाख रु. २) १२ गोवंश किंमती ९६ हजार ३) मोबाईल किंमती २ हजार असा एकूण ६ लाख ९८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर जप्ती मुद्देमाल वाहनासह पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. मौदा यांचे ताब्यात देण्यात आले असून त्याचे विरुद्ध कलम १९(१) ड प्राणी संरक्षण कायदा ५ (१) व ९ प्राण्यांना निर्दयतेने वागणूक कायदा १८४. १३०/१७७ मोवाका सहकलम ३४, १०९ भा.दं. वो अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन मौदा करीत आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) विशाल आनंद (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस हवालदार विनोद काळे, मयूर डेकले, पोलीस अंमलदार राकेश तालेवार यांनी पार पाडली..