नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत बेसा पिपळा रोड, लेव्हरेज ग्रुप कंन्सट्रक्शन कंपनीचे स्टोअर किपर फिर्यादी स्वप्नील अशोक कुंभारे वय ४० वर्ष, रा. प्लॉट नं. ६४, दुबेनगर, राजापेठ, नागपूर यांनी स्टोअर रूमचे दाराला कुलूप लावुन घरी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्टोअर रूम मागील भिंतीला छिद्र पाडुन आत प्रवेश केला व रूम मध्ये ठेवलेले वेग-वेगळ्या एम.एमचे एकुण ५१ व्हीगार्ड कंपनीचे वावर बंडल एकुण किंमती अंदाजे १,८३,०००/- रू चा मुद्देमाल बोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे अज्ञात आरोपीविरुध्द कलम ३०५(अ), ३३१ (३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात हुडकेश्वर पोलीसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून आरोपी योगेश उर्फ लक्की रमेश शाहु वय २७ वर्ष, रा. ह.मु. महाकाली नगर नं. ३, कोल्हे यांचे घरी किरायाने, दहनघाट मागे, नागपूर यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता, आरोपीने नमुद चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीस अधिक विचारपूस केली असता, आरोपीने वर नमुद ठिकाणी चोरलेला मुद्देमाल पोलीस ठाणे अजनी हदीत जाळुन शिल्लक राहीलेली तांबेची तार ही आरोपी क. २) शेख हुसैन उर्फ बब्बू कबाडी वल्द अब्दुल रशीद वय ५० वर्ष, रा. एलॉट नं. १, बजरंग नगर, गल्ली नं. ९, शाहु कॉलोनी अजनी, नागपूर याचे कडे विकल्याचे सांगीतले. तसेच आरोपी क. १ याने पोलीस ठाणे बजाजनगर हद्दीतील एका नवनिर्माणाधीन बांधकाचे ठिकाणाहुन वायरचे बंडल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींचे ताब्यातुन जळालेली तांब्याची तार वजनी ३८ किलोग्राम किमती अंदाजे २४,०००/- रू. व गुन्हयात वापरलेली एक होन्डा कंपनीची अॅक्टीव्हा मोपेड गाडी असा एकुण किंमती अंदाजे ७४,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींकडुन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, अश्वती दोरजे सह पोलीस आयुक्त नागपुर शहर, शिवाजीराव राठोड अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) नागपुर शहर, अर्चित चांडक, पोलीस उप आयुक्त (परि, क. ४), विनायक कोते, सहा. पोलीस आयुक्त (अजनी विभाग), यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि, ज्ञानेश्वर भेदोडकर, पोनि. नागेशकुमार चातरकर (गुन्हे), पोउपनि, महेश पांडे, पोहवा, मनोज नेवारे, संदीप पाटील, संतोष सोनटक्के, दिनेश गाडेकर, चेतय वैद्य, नापोअं. विजय सिन्हा, पोअं. मंगेश मडावी, हिमांशू पाटील, कुणाल ऊके यांनी केली.