उमरेड :- पोलीस उमरेड येथील स्टाफ पोलीस स्टेशन उमरेड हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, बायपास चौक उमरेड तसेच गांगापूर उडाण पुलीया उमरेड येथे ०३ ट्रक टिप्परद्वारे रेतीची चोरटी अवैधरीत्या विनारॉयल्टी वाहतूक होत आहे. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहिती वरून नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता स्टाफसह बायपास चौक उमरेड तसेच गांगापूर उडाण पुलीया उमरेड येथे १) अशोक ले-लॅन्ड कंपनीची एम.एच. ४० वी.जी. ८६७५ बा चालक आरोपी नामे वाजीद अहमद खान वय २५ वर्ष रा. बाबा ताज मश्जीद के पीछे पहल्ली गल्ली बहादुरा रोड नागपूर याने आपल्या ताब्यातील वाहनात ०५ ब्रास रेती अंदाजे कि. २५,०००/- रू तसेच २) टाटा कंपनीची टिप्पर क. एम. एच. ४९ ए.टी. ८६७५ वा अनोळखी फरार बालक याने आपल्या ताब्यातील वाहनात ०५ बॉस रेती किंमती २५,००० रू. ३) १२ बाकी टाटा कंपनीचा टीप्पर क. एम. एच. ४० बी. एफ. ९८८९ चा चालक आरोपी नामे सुमीत डवरू दिघोरे वय २२ वर्ष रा. आंबेनेरी ता. चिमुर जि. चंद्रपूर याने आपल्या ताब्यातील वाहनात ०९ ब्रॉस रेती किमंती ४५,००० रू. विना परवाना अवैध्यरित्या रेती वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपीतांच्या ताब्यातून तिन्ही ट्रक टिप्पर मधुन अंदाजे १९ ब्रास रेती किंमती ९५,०००/- रु. व तिन ट्रक टिप्परची किंमती ८००००००/- रू. असा एकुण ८०९५०००/-रू. चा मुद्देमाल अवैधरीत्या विनापरवाना वाहतूक करतांना मिळुन आल्याने घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. आरोपी क्र. ०१ व ०३ यांना अटक करण्यात आली. अवैद्यरित्या विनापरवाना शासनाचा महसूल बूडवून रेती भरून सार्वजनीक मालमत्तेचे नूकसान करून रेतीची चोरटी वाहतूक करतांना मिळून आल्याने आरोपीतांविरूद्ध कलम ३०३(२) भा.न्याय संहिता, ४८ (७), ४८(८), म. जमीन महसूल संहिता ४२१ खाण खनिज अधिनियम, ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक १३०, १७७ मोटरवाहन अधिनियम अन्वये गुन्हे नोंद करण्यात आलेला असुन पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भापोसे),अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोस्टे उमरेड येथील ठाणेदार पोनि अनिल राउत, पोहवा प्रदीप चवरे, राधेशाम कांबळे, पोना पंकज बट्टे, पोअं. गोवर्धन सहारे, तुषार गजभिये यांनी पार पाडली.