उमरेड :- अंतर्गत ०१ किमी अंतरावर भाईजी कॉम्प्लेक्स तहसील कार्यालयचे मागे परसोडी उमरेड येथे दिनांक ०६/०२/२०२४ चे १८.०० वा. दरम्यान फिर्यादी नामे तबस्सुम सलिमखान पठाण, वय ४४ वर्षे, रा. भाईजी कॉम्प्लेक्स तहसील कार्यालयाचे मागे परसोडी उमरेड व आरोपी नामे १) मेहमुद बानो हबीबखान पठाण वय ७० वर्षे. २) तन्वी उर्फे यूक्ती जावेद पठाण, वय ४२ वर्षे ३) शहनाज अलीमखान पठाण वय ४३ वर्षे ४) गजाला शकिल पठाण वय ३८ वर्षे ५) अलिमखान हबीबखान पठाण वय ४८ वर्षे. ६) जावेदखान हबीबखान पठाण वय ४३ वर्षे. ७) माहीन अलीमखान पठाण वय २१ वर्षे. सर्व रा. भाईजी कॉम्प्लेक्स तहसील कार्यालयचे मागे परसोडी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. फिर्यादी यांचे राहते घरी यातील आरोपीतांनी गैरकायदयाची मंडळी जमा करून फिर्यादीचे घरात घुसुन तु जावेदखान ला बँकेत काय बोलली तसेच रेल्वे मध्ये गेलेल्या जमिनीचे पैशाचे कारणावरून फिर्यादीस हाथबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व जीवाने मारण्याची धमकी दिली.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. उमरेड येथे आरोपीताविरुध्द कलम ४५२, १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६ भादेवी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर आरोपीतांना अटक करण्यात आली असुन सदर पटनास्थळी पोउपनि दिनेश खाटेले यांनी भेट दिली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश खोटेले पोस्टे उमरेड हे करीत आहे.