अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांना अटक, वाहनासह एकूण ३०,६०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

भिवापूर :- पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोलीस स्टेशन भिवापूर ह‌द्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, निलजकडुन ०२ ट्रक टिप्पर अवैधरीत्या विनारॉयल्टी उमरेडच्या दिशेने जात आहे. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहिती वरून नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता स्टाफसह मानोरा शिवार येथे १) एम एच ४०/वि जि ४२२९ चा चालक आरोपी नामे- चंद्रशेखर अशोक येरकुंडे वय २६ वर्ष उदासा ता. उमरेड जि. नागपूर याने आपल्या ताब्यातील वाहनात ०६ ब्रास रेती अंदाजे कि. ५०००/-रू. प्रमाणे ३०,०००/- रू तसेच एम एच-४०/वि जि ४२२९ बा मालक नामे मोहम्मद शेख मोहम्मद हारून सिदीकी वय ३० वर्ष रा. वाठोडा ले आउट नागपूर याचे सांगणेवरून रेती गुडेगाव घाटातून भरून आणल्याचे सांगितले. २) एम एच क ४०/वि एल- २८४५ चे चालक व मालक नामे रफिक नूर हसन शेख, वय ३० वर्ष रा. डोंगरगाव ता. कूही जि. नागपूर याने आपल्या ताब्यातील वाहनात ०६ ब्रास रेती अंदाजे कि. ५०००/-रू. प्रमाणे ३०,०००/- रू. दोन्ही ट्रक टिप्पर मधुन अंदाजे १२ ब्रास रेती किंमती ६००००/- रू. व दोन ट्रक टिप्परची किमती ३००००००/-रु. असा एकुण ३०,६०,०००/-रू. चा मुद्देमाल अवैधरीत्या विनापरवाना वाहतूक करतांना मिळुन आल्याने घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. आरोपी क्र. ०१ व ०३ यांना अटक करण्यात आली. अवैद्यरित्या विनापरवाना शासनाचा महसूल यूडवून रेती भरून सार्वजनीक मालमत्तेचे नूकसान करून रेतीची चोरटी वाहतूक करतांना मिळून आल्याने आरोपीतांविरूद्ध कलम ३०३(२), ४९, ३(५) भा.न्या.स. सक ४८(७), ४८(८) म.ज.महसूल संहिता १९६६, सक ४, २१ खानी. आणी खनिजे (विकास आणी नियमन) अधि. १९५७ स.क ३ सार्व. मालमत्ता नूकसान प्रति. अधि. १९८४ अन्वये गुन्हे नोंद करण्यात आलेला असुन पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोस्टे भिवापूर येथील ठाणेदार सपोनि जयप्रकाश निर्मल, परी पोउपनि किरण महागावे, पोहवा राकेश त्रिपाठी, पोअं मनोज चाचेरे, प्रितम खोपे, स्वप्नील ठाकरे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत सराफा दुकानदारांची बैठक संपन्न

Mon Aug 12 , 2024
सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर येथे दिनांक ०९/०८/२०२४ रोजी २०.३० वा. ते २१.३० वाजता पर्यंत अनिल म्हस्के सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांच्या अध्यक्षतेखाली व  रवींद्र मानकर पोलीस निरीक्षक सावनेर यांचे उपस्थितीमध्ये सराफा दुकानदारांची बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये दुकानदारांना सुरक्षा संबंधात काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. खाजगी सुरक्षा गार्डची नेमणूक करावी, सौसीटीव्ही कॅमेरे लावावे कोणताही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com