जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीतांना अटक

देवलापार :- अंतर्गत जुने पोस्टे देवलापार समोर एन. एच. ४४ हायवे रोड ०२ येथे दिनांक २२/०९/२०२४ चे ०७.५० वा. ते ०८.४० वा. दरम्यान देवलापार पोलीस पथक पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, जबलपूरकडुन नागपूरकडे एका लाल रंगाचा आयसर गाडी क्र. एम.एच.४०/सी टी- १२३५ ज्यावर कॅरेट बांधुन असुन त्यामध्ये गोवंश जनावरांची विनापरवाना व अवैधरीत्या निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन देवलापार पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करुन आरोपी नामे- १)

अल्लाउदीन रज्जाक शाह वय ४० वर्ष रा. वार्ड क्र. ०४ बडी होली सारंगपुर ता. सारंगगपुर जि. रायगड म.प्र. २) असलम खान अन्वर खान वय ३४ वर्ष, रा. वार्ड क्र. १५ मोहल्ला नयापुर सारंगपुर ता. सारंगपुर जि. रायगड.म. प्र. याचे ताब्यात असणारा आयशर गाडी क्र. एम. एच-४०/सी टी १२३५ नाकाबंदीचे दिशेने भरधाव वेगाने चालवित येतांना दिसला व नाकाबंदी पाहुन एकाएक रोडच्या बाजुला ट्रक थांबविला असता ट्रक ची स्टॉफसह पाहणी केली असता त्यामध्ये गोवंश जनावरांना कोंबुन त्यांना चाऱ्याची व बसण्याची कोणतीही सोय न करता दाटी वाटी मध्ये असुन पल्ल्याचे वर लाकडी फळया टाकुन त्यावर प्लास्टीक कौट दिसुन आल्याने सदर गोवंश कत्तलीकरीता वाहतुक करीत असल्याचे दिसुन आल्याने ट्रक मध्ये असलेले कंमाक

१) २३ गोरे गोवंश प्रत्येकी किंमती १५०००/- रुपये प्रमाणे किंमती ३४५०००/-रू. २) ३ गोवंश बैल प्रत्येकी किमंत २००००/- रुपये प्रमाणे किर्मती ६००००/- रुपये ३) २ गोवंश सांड प्रत्येकी किमंती २००००/- रुपये प्रमाणे किमंती ४००००/- रुपये ४) आयशर क्रमांक एम. एच-४०/सी टी- १२३५ किंमती १५०००००/- रुपये असा एकुण १९४५०००/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर प्रकरणी सरकार तर्फे फिर्यादी नामे पो.शि. सचिन भगवान येळकर पोस्टे देवलापार येथे वरील आरोपीतांविरुध्द कलम २८१ भान्यास सहकलम ११(१) (ड) प्रा.छ. अधी, सहकलम ५(अ), ९ म.प्रा.सं.का. सहकलम ११९ म.पो.का. १८४ मोवाका काडद्ययान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे देवलापार येथील ठाणेदार सपोनि नारायण तुरकुंडे, पोहवा रविंद्र मेश्राम, पोलीस अंमलदार सचिन येळकर, केशव फड यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कळमेश्वर पोलीसाची कार्यवाही मोटार सायकल चोरा कडून एकूण ०९ मोटार सायकली जप्ती

Wed Sep 25 , 2024
कळमेश्वर :- कळमेश्वर पोलीसांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाल्याने त्यांनी आरोपी १) तेजस अबर रामावत वय २२ वर्ष रा. ब्राम्हणी बायपास रोड कळमेश्वर २) विक्की उर्फ खुटी रामकृष्ण भलावी वय १८ वर्ष रा. येरला ता. जि. नागपुर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता पोलीसांना त्यांच्या कडुन पोलीस स्टेशन कळमेश्वरची ०१ मोटरसायकल, ०२ पाण्याच्या मोटार पंप, नागपूर शहर ह‌द्दीतील पोलीस स्टेशन बजाज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com