-पोलीस स्टेशन रामटेकची कारवाई
रामटेक :- अंतर्गत ०७ कि. मी. अंतरावरील मनसर चौक रामटेक येथे दिनांक १३/०१/२०२४ चे ००.४५ वा. ०१.४५ वा. दरम्यान रामटेक पोलीस पथक मन्सर परिसरात पेट्रोलींग करित असता, मुखबिरद्वारे माहीती मिळाली की, एक लाल रंगाचा आयसर ट्रक मध्ये रामटेक कडून मनसर गावाकडे अवैधरित्या जनावरांची अवैधरीत्या वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहिती वरून मनसर चौकात नाकाबंदी करून रामटेक कडून मनसरकडे एक लाल रंगाचा ट्रक येतांनी दिसल्याने, सदर ट्रक चालकास थांबवुन तपासले असता सदर ट्रक क्र. MH-28/BB-0972 चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव १) पुरेखान रियासत खान पठान, वय ४२ वर्ष, रा. वार्ड क्र. ०६ मुजावर गल्ली मगरुलपीर जि. वाशिम (चालक) असे सांगितले तसेच ट्रक मध्ये असलेले इतर दोन २) विजेता गरिबदास वराड वय ३० वर्ष रा. मरारटोला त. जि. गोंदिया (क्लिनर), ३) प्रकाश रतिराम कुबळे वय २४ वर्ष रा. डांगोरली त. जि. गोंदिया (क्लिनर) हे जनावरे निर्दयतेने वाहतुक करतांना मिळुन आले.
सदर ट्रकची पाहणी केली असता सदर एक मध्ये मागील डाल्यामध्ये पांडव्या व तांबुस लाल रंगाची एकुण २२ जनावरे (त्यामध्ये पांढ-या व ताबुस लाल रंगाचे वैल) यांना गाडी मध्ये तोंडाला बांबुन कोणत्याही प्रकारचे चारा पाण्याची व्यवस्था न करता जनावरांना हयगयीचे वर्तन करून त्यांना क्रूरपणे निदर्यतेने वागणुक देवुन वाहनात डांबुन वाहतुक करित असतांना आढळुन आले, सदर जनावरे यांना प्राथमिक औषधोपचार करणेकामी तसेच संरक्षणकामी गौविज्ञात अनुसंधान केंद्र देवलापार येथे नेवुन दाखल केले. आरोपीतांकडुन सदर गुन्हयात वापरण्यात आलेले आयसर ट्रक क्र. MH-28/BB- 0972 किंमती १०,००,०००/- रु. व २२ जनावरे (त्यामध्ये पांढन्या व तांबूस लाल रंगाचे वैल) प्रत्येकी किंमती १०,०००/- रू. प्रमाणे एकुण किंमती २,२०,०००/- रू. असा एकुण १२,२०,०००/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच आयसर ट्रक क्र. MH-28/BB-0972 च्या चालकास सविस्तर विचारपुस केले असता, त्यांनी सांगितले की, सदर जनावरे हे इम्रान शेख रा. गांदिया यांचे सांगणेवरुन गोंदिया वरुन वाशिम येथे पेवुन जात होतो. आरोपीताविरूद्ध कलम ११ (१) (ड) प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६०, सहकलम ५ (अ) (१), १ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियन अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय खोब्रागडे हे करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नागपुर ग्रामीण हर्ष ए. पोहार, अपर पोलिस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात ठाणेदार हदयनारायण यादव, पोलीस नायक प्रफुल रंबई, गोपाल डोकरीमारे, पोलीस अंमलदार मनोज लांजेवार, चालक पोलीस हवालदार विशाल बोटारे यांनी केलेली आहे.