कन्हान :- मे २०१६ ते आक्टोवर २०२२ दरम्यान यातील आरोपी नामे- मनोज शेन्डे वय ३९ वर्ष रा संताजी नगर कन्हान याने फिर्यादी / पिड़ता वय ३२ वर्ष हिला मे २०१६ मध्ये फिर्यादी ही आरोपी याचे राहते घरी पाणी पाउच कंपनी मध्ये कामाला होती तेव्हा सदर आरोपीने फिर्यादी हिला म्हटले होते की तु मला खुप आवडते असे म्हणून फिर्यादी सोबत मैत्री करून शारीरीक संबंध केले नंतर आरोपीने फिर्यादीस पुन्हा संबंध बनविण्याकरीता बोलले. असता फिर्यादीने आरोपीस म्हटले कि माझे लग्न झाले आहे आणि आरोपीचा पाणी पाउच कंपनी मधुन काम बंद केले तेव्हा पुन्हा आरोपीने फिर्यादीस म्हटले कि जर तु माझा सोबत संबंध ठेवले नाही तर मी तुझा घरचा लोकांना आपल्या संबंधाबाबत सगळयांना सांगुन देईल अशी धमकी देऊन यातील नमुद आरोपीने फिर्यादी सोबत मे २०१६ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत वेगवेगळ्या जागी नेऊन शारीरीक संबंध केले असता यातील आरोपी याने फिर्यादीस बदनामी व जिवे मारण्याची धमकी देत असल्याने फिर्यादीने तिचा पतीस सर्व घडलेली हकिकत सांगुन फिर्यादीने तिचा पती सह पोलीस स्टेशन कन्हान येथे येऊन आरोपी विरुध्द तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. कन्हान येथे आरोपीविरुद्ध कलम ३७६, ३७६ (२) (द) भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि चव्हान पो.स्टे. कन्हान मो. नं ९९२३००२६६४ हे करीत आहे.