केळवद :- अंतर्गत मौजा उमरी गावाचे ब्रिज जवळ दिनांक ०५/०१/२०२४ रोजी पोलीस स्टेशन केळवद येथील पोलीस पथक पोलीस स्टेशन केळवद हद्दीत नाकाबंदी करीत असताना मुखबिरद्वारे मिळालेल्या खबरे वरुन एक इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे.
अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन केळवद पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकावंदी करुन मौजा उमरी गावाचे ब्रिज जवळ नाकाबंदी करुन आगसर क्र. एम.एन-४०/सी.वी-०११५ ना चालक आरोपी नामे अकबर मामुर खान, वय ३४ वर्ष, रा. खेडी पोस्ट तलेनी तह. सारंगपुर जि. राजगड (एम.पी) याने आपल्या ताब्यातील वाहनात ४० नग जिवंत बैल गौवंश व ३ नग मृत बैल गौवंश जनावरांना अत्यंत क्रूर व निर्यदयतेने वाहनात डांबुन त्यांना आखुड दोरीने पाय व तोंड बांधून चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने अपुल्या जागेत कोंबुन कतलीसाठी अवैद्यरित्या वाहतुक करतांना मिळुन आल्याने आरोपीच्या ताब्यातून सदर आयसर क्र एम. एच ४०/सी, टी-०११५ किंमती १०,००,०००/- रु. मध्ये ४० नग जिवंत बैल गौवंश किंमती ६,००,०००/- रु व ३ नग मृत बैल गौवंश किंमती ००/- रु. असे एकूण ४३ जनावरे कत्तली करिता घेऊन जात असता मिळून आले आहेत. ट्रक चालक यास ताब्यात घेऊन त्यांचेवर कारवाई करुन जनावरे चारपाणी रहाण्याची सोय करिता गौशाला येथे जमा करण्यात आले.