नागपूर जिल्हा पेटवण्याची चिथावणीखोर भाषा करणाऱ्या केदारला अटक करा – ऍड. धर्मपाल मेश्राम

– भ्रष्टाचारी सुनील केदारचा दलित विरोधी चेहरा पुढे

नागपूर :- हिंगणा विधानसभा क्षेत्रातील सातगाव ग्रामपंचायतच्या दलित महिला उपसरपंचाला अभद्र भाषेत जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या सरपंच योगेश सातपुते याच्यावर पोलिसांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र भर सभेत सरपंच योगेश सातपुते याच्या कृत्याचे समर्थन करून आरोपीच्या केसाला जरी धक्का लागला तर नागपूर जिल्हा पेटवून टाकू, अशी चिथावणीखोर भाषेत धमकी देणाऱ्या भ्रष्टाचारी सुनील केदारला अटक करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम व नागपूर जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

हिंगणा विधानसभा क्षेत्रातील सातगाव ग्रामपंचायतचा सरपंच योगेश सातपुते याने गावच्या दलित महिला उपसरपंचावर अभद्र टिप्पणी करून जातीवाचक शिवीगाळ केली. सरपंच योगेश सातपुते यांच्याविरोधात दलित महिला उपसरपंचाने बुटीबोरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आरोपी सरपंचाविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. असे असतानाही दलित महिला उपसरपंचाशी अपशब्दात गैरवर्तवणूक करणाऱ्या या सरपंचाच्या कृत्याचे जनतेपुढे जाहीर सभेत सुनील केदार यांनी समर्थन केले आहे. एवढेच नव्हे तर ‘योगेश सातपुतेच्या केसाला जरी धक्का लागला तर नागपूर जिल्हा पेटवून टाकू’ अशी चिथावणीखोर भाषेत धमकी दिली आहे.

एकूणच हा सर्व प्रकार दलितावरील अत्याचाराच्या घटनांचे समर्थन करणारा आणि आरोपींचे संरक्षण करणारा आहे. जातीजाती मध्ये कलह निर्माण करून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा सुनील केदार यांचा कट आहे.

एकीकडे काँग्रेसचे नेते दलितांच्या हिताचा पुळका दाखवतात तर इकडे त्याच काँग्रेसचा सुनील केदार दलितांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला वाचविण्याची भाषा करतो. सुनील केदार यांची भूमिका नेहमीच दलितविरोधी राहिली आहे. रामटेक लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीत दलित समाजाच्या उमेदवाराला विरोध असो की सातगावच्या महिला उपसरपंचाला जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या योगेश सातपुतेला वाचविण्यासाठी धमकी देणे असो, यातून सुनील केदार यांचा दलित विरोधी चेहरा पुढे आला आहे.

या संपूर्ण प्रकरणी तात्काळ दखल घेऊन दलित उपसरपंचाला अभद्र भाषेत जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या योगेश सातपुतेला तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच अशा आरोपींचे समर्थन करून नागपूर जिल्ह्यातील वातावरण पेटविण्याची भाषा करणाऱ्या सुनील केदार यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी ऍड. धर्मपाल मेश्राम व आतिश उमरे यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कृषि अनुसंधान परिषदेच्या शास्त्रज्ञांकडून कृषि विज्ञान केंद्रास भेट व आढावा

Sun Sep 8 , 2024
यवतमाळ :- भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.श्रवनन एम. आणि शास्त्रज्ञ डॉ. राहुल फुके यांनी कृषी विज्ञान केंद्रास प्रक्षेत्र भेट देवून आढावा बैठक घेतली. याप्रसंगी प्रगतशील शेतकरी जगदीश चव्हाण, निलेश टाके, साधना सारड, कृष्णा ठाकरे, प्रदीप गुल्हाने, आशिष गायकी, कुणाल पटले, विकास गर्जे व कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com