नागपूर :-पोलीस स्टेशन मौदा जिल्हा नागपुर ग्रामीण नागपुर येथे नागपुर जिल्हयातील पिडीत १५८ शेतकरी यांना नैसर्गीक आपत्तीमुळे शासनाकडून नुकसान भरपाई देण्याचे आमीष देवून त्यांचेकडुन विश्वासाने संबंधीत कागदपत्र घेवुन शेतकरी यांचे नावे करोडो रूपयाचे बोगस कर्ज प्रकरणे तयार करून ते बैंक रेकॉर्डवर खरे असल्याचे दाखवून ११३, ४६, ९९,००३ /- रूपयाचा अपहार करून फसवणुक केल्याचे फिर्यादीचे रोपोर्ट वरून पोलीस स्टेशन मौदा येथे गुन्हे रजि नं. ७८३/२०२३ कलम ४०६, ४०९, ४१३, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (व) भादंवि सहकलम ३ एम. पी. आय. डी. सहकलम ६६ (बी) आय टी. अॅक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोहार (भा.पो.से) यांनी सदर गुन्हयातील मुख्य आरोपी संदीप रेवनाथ जगनाडे सहायक बैंक मैनेजर यांचा शोध घेवुन अटक करणे कामी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील विशेष पथक तयार केले, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुख्य आरोपींचा शोध सुरु करून तांत्रिक पद्धत तसेच गोपनिय बातमीदार यांच्याकडुन खात्रीशिर माहिती वरून आरोपी यास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस उपनिरीक्षक वढ्दुलाल पांडे व इतर स्टाफ ने चेन्नई येथे शोधकामी जावुन सदर आरोपी हा यवतमाळ येथे असल्याचे माहिती पडल्याने यवतमाळ येथे जावुन आरोपीस अटक केले.
सदर आरोपी हा घटनेचे वेळी नागपूर येथे सन २०१६ ते २०१८ मध्ये कार्पोरेशन बँकेत सहायक मॅनेजर या पदावर कार्यरत होता. आरोपीस दिनांक १५/१२/२०२३ चे ०२.०० वा. अटक केलेली असुन २०/१२/२०२३ पर्यंत पीसीआर मध्ये आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष पोहार (भा.पो.से.) तसेच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोउपनि बटुलाल पांडे, पोहवा विनोद काळे, इक्बाल शेख, मोनु शुक्ला, संजय बदोरीया, पोशि राकेश तालेवार यांनी पार पाडली.