ऋतुजा लटके यांच्या पराभवाच्या भीतीने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार – आनंद रेखी

महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचा मान भाजपने राखला

पक्षाच्या भावनिक संवेदनशीलतेचा प्रत्यय

मुंबई :- राज्यातील राजकीय दृष्ट्या हायव्होल्टेज ठरत असलेली अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदार संघांतील पोटनिवडणुकीत भाजपचा विजय निश्चित होता.पंरतु, ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा पराभव होवू नये, यामुळे त्यांचे पती दिवंगत आमदार रमेश लटके यांना खऱ्या अर्थाने भाजपने आपला उमेदवार मागे घेवून अपर्ण केलेली ही आदरांजली आहे,असे स्पष्ट मत भाजप नेते आनंद रेखी यांनी मंगळवारी व्यक्त करीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

पुरोगामी महाराष्ट्राला सुसंस्कृत असा राजकीय वारसा लाभला आहे.राज्याच्या या गौरवशाली, वैभवशाली परंपरेचा मान केवळ भाजपच राखतो. पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे घेत दिवंगत लटके यांना पक्षाने श्रद्धांजली दिली आहे. पक्षाच्या या भूमिकेचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. भाजपने आपला उमेदवार मागे घेवून विशाल हिंदुत्वहृदयाचे मुर्तीमंत उदाहरण सादर केले आहे. मात्र काही विरोधकांच्या पोटात त्यामुळे दुखायला लागले आहे. राऊत आणि अंधारे यांनी यानिर्णयानंतर भाजपवर केलेली टिकेतून त्यांच्या कोत्या मनाचा प्रत्यय येतो,असे रेखी म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्ष केवळ विजयासाठीच निवडणूक लढवत असतो. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा पोटनिवडणुका असो. फडणवीसांच्या कणखर नेतृत्वात पक्षाला मोठे यश मिळतेच. राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने ३५२ ठिकाणी विजय मिळवला आहे. ठाकरे गट, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा अधिक जागा मिळवून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

प्रत्येक निवडणूक भाजप कार्यकर्ता वैचारिक विजयासाठीच लढवत असतो. पंरतु, समाजसेवेसाठी राजकारण करतांना राज्यातील परंपरेचे देखील पालन पक्षाकडून केले जाते. मात्र पक्षाच्या या भूमिकेचे स्वागत करण्याऐवजी ठाकरे गटातील नेते केवळ नागरिकांना भ्रमित करण्यासाठी आणि द्वेषातून आरोप प्रत्यारोप करीत आहे, हे योग्य नसल्याचे मत व्यक्त करीत उद्धव ठाकरे यांनी अशा नेत्यांना समज द्यावी, असे आवाहन रेखी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ आणि तातडीची मदत जाहीर करावी - अजित पवार

Tue Oct 18 , 2022
मुंबई :- महाराष्ट्रात पावसाने शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करतानाच आपला शेतकरीराजा कसा उभा राहिल यासाठी तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे तर जलमय करुन टाकले आहे. तर दुसरीकडे पुन्हा एका चक्रीवादळाचे संकट उभे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights