जगभर ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार,मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबईओमायक्रॉन विषाणुच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने वाढले पाहिजेयादृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

महाराष्ट्राने सध्या 12 कोटीं 3 लाख 18 हजार 240 डोसेस दिले असून 4 कोटी 37 लाख 46 हजार 512 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.  7 कोटी 65 लाख 71 हजार 728 लोकांनी एक डोस घेतला आहे. 

18 ते 44 वयोगटात 76.69 लोकांनी कमीत कमी 1 डोस तर 45 पेक्षा अधिक वयोगटातील 85.25 टक्के लोकांनी एक डोस घेतलेला आहे. 

गेल्या 12 तासात संपूर्ण जगात ओमायक्रॉनच्या रुग्णात 45 टक्के वाढ झाली असून 54 देशात याचा प्रसार झाला आहे.  फ्रान्समध्ये दैनंदिन रुग्ण 40 हजारच्या पुढे आढळत असून जर्मनीत ही संख्या 50 हजाराच्या आसपास आहे.  ऑस्ट्रीयामध्ये देखील कोविड सुरु झाल्यापासून सगळ्यात मोठी लाट आली असून दररोज 7 हजारच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत.  अमेरिकेत देखील नोव्हेंबर 2020 सारखी परिस्थिती उद्भवली असून दररोज एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत.  दक्षिण आफ्रिकेत गेल्या 2 आठवड्यात नवीन रुग्णात मोठी वाढ झाली असून दररोज दुपटीने रुग्ण आढळत आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील काळजी घेण्याची गरज असून आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळले गेलेच पाहिजे यावर भर देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

जिल्ह्यात सिकलसेल नियंत्रण सप्ताहाचे आयोजन 11 ते 17 डिसेंबर

Thu Dec 9 , 2021
  – सप्ताहादरम्यान मोफत तपासणी नागपूर दि.08 : सिकलसेल या गंभीर आजाराबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात 11 ते 17 डिसेंबर या कालावधीत सिकलसेल नियंत्रण सप्ताहाचे आयोजन  प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुगणालय, डागा स्त्री रुग्णालयात करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी या सप्ताहादरम्यान तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोगय अधिकारी  डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे. या सप्ताहादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!