संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दसरा सणानिमित्त नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे शस्त्रपूजन करण्यात आले.याप्रसंगी पोलिसांच्या ताफ्यात असलेल्या रायफली, बंदुका,वाहने यांचे पूजन पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे,एपीआय सचिन यादव, यासह पोलीस स्टेशन चे अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या हस्ते शस्त्रपूजन व वाहनांची पूजा करण्यात आले. याप्रसंगी पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.