कोदामेंढी :- येथून अंदाजे 8 ते 10 किमी अंतरावर असलेल्या धर्मापुरी येथील पाणी पुरावठा करणाऱ्या विहिरीला उन्हाळ्यात पूरेसा पाणी राहत नाही व तेथील पाण्याच्या स्त्रोतामधून गढ़ुळ पाणी येत असते.पावसाळ्यात तर नदिच्या धारेतील गढ़ुळ पाणी सरळ विहिरीतून पाइप लाइन ने गावातील नागरिकांच्या नळाला येत असल्याचे सरपंचांचे पति गणराज भिवगडे यांनी सांगितले.त्यातच मागील अनेक वर्षापासून एकच पाण्याची टाकी असून पाणी साठवणाऱ्या टाकीची क्षमता गावातील लोकसँखेच्या तुलनेत कमी असल्याने गावातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होत नसून गावात पाणी टंचाई सदृश्य स्थिति नेहमी असते.
याकरिता शासनाच्या संबंधित विभागाने जलजीवन मिशन अंतर्गत धर्मापुरी येथे पुन्हा दूसरी पाणी पुरावठा करणारी विहिर व पाणी साठवीण्याची टाकी मंजूर करण्याची मागणी गट ग्रा. पं. धर्मापुरी च्या सरपंचा सविता भिवगड़े, त्यांचे पति गनराज भिवगड़े, गवातिल महिला मंडळी सुभद्रा विलायतकर, रेखा भिवगड़े, गीता बावनकुले सह ग्रामस्थान्नी केली आहे. याबाबत सम्बंधित विभागाला व लोकप्रतिनिधि यांना ठराव व निवेदने दिल्याचे सरपंचा यांनी सांगितले.