योगेश रंगारी यांची नागपुर खंडापीठाच्या आदेशाने नगरपरिषद उपाध्यक्ष पदी नियुक्ती

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

काॅंग्रेसपदाधिकाऱ्यांनी विजय मिरवणुक काढुन जल्लोष साजरा केला.

कन्हान : – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठा च्या आदेशानंतर माजी उपाध्यक्ष योगेश उर्फ ​​बाबु रंगारी यांची पुन्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याने काॅंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुलदीप मंगल कार्यालय ते कन्हान नगरपरिषद पर्यंत विजय मिरवणुक काढुन विजय जल्लोष साजरा केला.
कन्हान-पिपरी नगरपरिषद येथे काँग्रेस,शिवसेना आणि प्रहार ने सन २०२० मध्ये सत्ता स्थापन केली होती. यात कॉग्रेसचे योगेश रंगारी यांना कन्हान नगर परिषदचे उपाध्यक्ष करण्यात आले होते. त्यानंतर भा जप आणि काँग्रेस च्या दोन नगरसेवकांनी १२ फेब्रुवा री २०२१ रोजी विशेष सभेत अविश्वास ठराव मंजुर करून योगेश रंगारी यांना नप उपाध्यक्ष पदावरून पायउतार करून शिवसेनेचे डायनल शेंडे यांची उपाध्य क्ष पदी निवड केली. या प्रकरणी योगेश रंगारी यांनी मुंबई उच्च न्यायालया च्या नागपूर खंडपीठात न्याया साठी अपिल केले होती. ज्यावर न्यायालयाने पीठासी न अधिकारी व नगराध्यक्षा करूणा आष्टणकर यांनी विशेष सभेत मतदान करणे, पुर्ण बैठक १४ मिनटात संपवणे, नगरसेविकांची खरीद फरोख्त अश्या अनेक मुद्द्यांचा विचार करून २० जुन २०२२ रोजी न्यायाल या द्वारे १२ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित विशेष सभेला अवैध घोषित करून योगेश रंगारी ला पुन्हा नप उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आले. नागपुर खंडापीठाच्या आदेशा नंतर योगेश रंगारी हे पुन्हा नप उपाध्यक्ष झाल्याने काॅंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुलदीप मंगल कार्यालय पासुन विजय मिरवणुक काढुन ही मिरवणुक आंबेडकर चौक येऊन डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करून राष्ट्रीय महामार्गा ने कन्हान-पिपरी नगरपरिषद येथे पोहोचली असता तिथे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. उपस्थित सर्वांना मिठा ई वाटुन विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
याप्रसंगी काँग्रेस कमेटी नागपुर जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे, कांद्री ग्रा पं सरपंच बलवंत पडोळे, उपसरपंच श्यामकुमार बर्वे, धनंजय सिंग, महिला शहर अध्यक्ष रिता बर्वे, नगरसेवक मनीष भिवगडे, नगरसेविका गुंफा तिडके, रेखा टोहणे, पप्पु जामा, शिवाजी सिंग, आनंद नायडु, सदरे आलम, अभय रेड्डी, अजय कापसी कर , राजा यादव, सतीश भसारकर, शरद वाटकर सह पदाधिकारी व कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने कामठीत भारत बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Sat Jun 25 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 25 :- देशाची एकता ,अखंडता धोक्यामध्ये टाकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे .संघ आणि भाजप देशद्रोही असल्याचा आरोप करीत .याविरोधात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात 25 जून रोजी ‘भारत बंद ‘ची हाक देण्यात आली होती . या भारत बंद आंदोलनाला बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी हेमलताताई पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत नागरीकानी उत्स्फूर्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com