नागपूर :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील उपमुख्यमंत्री कार्यालयाचे मानद सचिव (Honorary Secretary) म्हणून माजी महापौर संदीप जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून ही माहिती दिली आहे.
संपूर्ण विदर्भातून येणा-या विविध समस्या आणि निवेदनांच्या समन्वयाची जबाबदारी संदीप जोशी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.