मोतीराम रहाटे,प्रतिनिधी
कन्हान (नागपुर) :- कांद्री येथील सामाजिक कार्यकर्ता पंकज नांदुरकर यांची महाराष्ट्र राज्य धोबी (परिट) समाज महासंघ सर्व भाषिक नागपुर ग्रामिण कार्यकारणीत युवा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य धोबी (परिट) समाज महासंघ सर्व भाषिक नागपुर ग्रामिण कार्यकारणीचा विस्तार संस्थापक अध्यक्ष डी डी सोनटक्के यांच्या नेतृत्वात पार पडला. या मध्ये कांद्री- कन्हान येथील सामाजिक कार्यकर्ता पंकज नांदुरकर यांची महाराष्ट्र राज्य धोबी (परिट) समाज महासंघ सर्व भाषिक नागपुर ग्रामिण कार्यकारणीत युवा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्ती नंतर धोबी समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डी डी सोनटक्के यांनी पंकज नांदुरकर यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्रातील धोबी समाजाच्या विविध प्रश्नासाठी शासन आणि व्यवस्थेच्या विरूध्द लढाई करावी लागणार आणि ग्रामपातळी पर्यंत राज्यातील ३० लाख धोबी समाजाच्या सामजिक आर्थिक शैक्षणिक व राजकीय हक्काच्या या ऐतिहासिक लढयातील एक अग्रणी सैनानी म्हणुन हि महत्वाची जवाबदारी पंकज नांदुरकर यांना सोपविण्यात आली व हि नियुक्ती महाराष्ट्रातील धोबी समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी आपले योगदान लाभावे म्हणुन करण्यात आली असल्याचे संबोधित केेले.