संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 21 :- आगामी ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या कांग्रेस च्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस समितीने निवड केलेल्या कांग्रेस च्या प्रदेश प्रतिनिधीमध्ये कामठी शहराचे प्रसिद्ध व्यवसायी व कांग्रेस चे वरिष्ठ नेता मनोज शर्मा , माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, माजी नगराध्यक्ष शकुर नागाणी , माजी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत तसेच कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हुकूमचंद आमधरे यासह आदी कांग्रेस पदाधिकारीची शिक्कामोर्तब करण्यात आले.
पूर्व कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा पूर्वीच कांग्रेस चे मनोज शर्मा यांना छत्तीसगढ राज्याचे मीडिया व प्रसिद्धी विभागाचे समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आले तर आगामी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या कांग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कामठी चे मनोज शर्मा सह आदी कांग्रेस पदाधिकारीना मतदान करण्याची संधी मिळणार असल्याने कामठी शहराचे नाव उंचावले असून मनोज शर्मा यांच्या या पदोन्नतीबद्दल मनोज शर्मा समर्थक कार्यकर्त्यांत मोठा उत्साह संचारला आहे तर या नियुक्तीबद्दल मनोज शर्मा यांनी कांग्रेस चे अखिल भारतीय कांग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक,माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात व प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे मनपूर्वक आभार मानले.